आशाई मसाले च्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या नवनिर्वाचित सरपंच,सदस्य,पत्रकार यांचा सन्मान

 आशाई मसाले च्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या नवनिर्वाचित सरपंच,सदस्य,पत्रकार यांचा सन्मान





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली : १ डिसेंबर 
     
   

                    आजची तरुण मुले व्यवसाय न करता नोकरी मध्ये आपले सर्वस्व मानत असतात.मात्र माजगांव गावातील सचिन पाटील,या तरुणांने नोकरी न करता घरघुती स्वयपांक साठी लागणारे विविध प्रकारचे मसाले बनविण्यांचा व्यवसाय सुरु केला.आज तीन वर्ष पुर्ण झाली,जवळ - जवळ पाच हजार दुकानदार जोडले गेले असून,हजारो ग्राहक हे विविध प्रकारचे मसाले खरेदि करीत आहे.त्याच बरोबर साजूक तुप सुद्धा विक्रीस असून या सर्व  प्रोडक ला आशाई मसाले आईचे नाव देवून या तरुणांनी एक ग्रामस्थांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे.आज तिसरा वर्धापन दिन असल्यामुळे ग्रूप ग्राम पंचायत माजगांव निवडून आलेले सरपंच,उप सरपंच,सदस्य तसेच पत्रकार यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आले.          
                 


   या निमित्ताने सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे दिप प्रज्योलन खालापुर तालुका प्रमुख शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) एकनाथ पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच सत्कार मुर्तीस सत्कार देवून सन्मानित करण्यात आले. शिवसेनेचे नेते आत्माराम पाटील उपस्थित होते.ह्या व्यवसायासाठी ,त्यांचे आई,वडील,भाऊ, रुपेश पाटील,सचिन पाटील,तेजेश ढवाळकर,स्वरुपा पाटील,गिता पाटील,पुजा पाटील,एकनाथ ढवाळकर, या व्यवसायात स्वताला झोकून दिले आहे,लग्न मंडपाचा व्यवसाय असून सुद्धा सध्या महिला वर्गांसाठी लागणारे विविध मसाले रायगड जिल्हासह पुणे येथे मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यांचे येथिल व्यवस्थापक यांनी सांगितले.
             

   या वर्धापन दिनांच्या निमित्ताने सत्कार मुर्ती म्हणून गृप ग्राम पंचायत माजगांव नवनिर्वाचित सरपंच दिपाली नरेश पाटील, उप सरपंच राजेश पाटील,सदस्या -अर्पणा यशवंत शिंदे,वंदना सुधाकर महाब्दि,पुनम प्रकाश जाधव,प्रांजळ प्रदिप जाधव, वैशाली नितिन महाब्दि,सरिता कमलाकर वाघे, सदस्य -शशिकांत गजानन पाटील,मधुकर गायकवाड,रविंद्र भिवा ढाकसळ,तसेच पत्रकार काशिनाथ जाधव यांस आशाई चे सन्मान चिन्ह,शाळ,श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.

               यावेळी या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर सभापती - जयवंत पाटील,आर.पी.आय. रायगड जिल्हा कार्याध्यक्ष - अविनाश कांबळे,सामाजिक कार्यकर्ते - नरेश पाटील, निखिल पाटील,भारती लोते,गजानन पाडगे,राजेश मेहत्तर,विशाल म्हामूणकर,यावेळी ,मंगेश पाटील,देवराम कांबळे,रमेश जाधव,नितिनि महाब्दि,उद्योजक - अमित पाटील,चंद्रकांत पाटील,अदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर