वडगाव येथे रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन
पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप
खालापूर : ४ डिसेंबर
गाव तिथे उत्तम रस्ते,असायला हवे या उद्दात विचारांतून तसेच गावातील रस्ते उत्तम दर्जाचे व्हावे,यासाठी स्थानिक विकास निधी च्या माध्यमातून वडगांव येथिल रखडलेल्या रस्त्याचे काम होत असल्यामुळे येथिल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे.
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य पद्माताई सुरेश पाटील यांच्या माध्यमातून २५,१५ /१२, ३८ योजनेच्या अंतर्गत तसेच सुरेश पाटील,यांच्या विशेष प्रयत्नातून वडगाव येथे जुनी विहिर ते आत्माराम भिमसेन जांभूळकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम यांच्या स्थानिक विकास निधी मधून मंजूर झाले असून आज या विकास कामाचा भूमिपूजन करण्यात आले.
रस्त्याचे भूमिपूजन सुरेश दीनानाथ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस भूमिपूजन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ,वडगाव ग्रामपंचायत सदस्य - नंदकुमार पाटील ,नंदा जांभूळकर (उद्योजक) आत्माराम जांभूळकर,(उद्योजक)संतोष ठोंबरे, (माज़ी सरपंच ),परशुराम गाताडे,सुनील बडेकर, मा सदस्य ,उमेश ठोंबरे,मोतीराम पाटील,अनंता गडगे,संतोष तुपे, संतोष गडगे,मोतीराम पाटील,सखाराम ठोंबरे,सुनील गडगे,सदा ठोंबरे आदि कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments