श्री गणेशनाथ महाराज दिंडीचे आदोशी येथे उत्साहात स्वागत

 श्री गणेशनाथ महाराज  दिंडीचे आदोशी येथे उत्साहात स्वागत




पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप 
खालापूर : ६ डिसेंबर 

              श्री गणेशनाथ महाराज पेण येथील पायी दिंडीचे आदोशी वासियांनी भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करुन दिंडीत आलेल्या वारकरी संप्रदायातील भक्तांची सेवा केली.
              आदोशी गावातील स्वागताचे हे 3 रे वर्ष असून गावातील सर्व ग्रामस्थांनी सेवा म्हणून वारकरी मंडळीयांस अन्नदान करीत असतात.तसेच जय हनुमान मित्र मंडळाने वारकरी ट्रस्ट ला आथिर्क मदत करुन इतर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यास मदत करण्यात आली. तसेच आदर्श चेऊळकर ह्या छोट्या वारकरी कडून चहा, नाष्टा व आर्थिक मदत करण्यात आली.सदर प्रसंगी दिंडी प्रमुखांनी गावकऱ्यांचे आभार मानत  सुखी समृद्ध निरोगी आयुष्याचा आशिर्वाद दिला.
                ह्या प्रसंगी गावातील जेष्ठ मंडळी  गणपत तेलंगे,कमलाकर वाघमारे,सखाराम मुंब्रे, रमेश तेलंगे,संदीप मुंब्रे,प्रविण वाघमारे, आकाश चेऊळकर,तसेच महिला अनिता शिरोडकर,अस्मिता मुंब्रे शुभांगी चेऊलकर प्राजक्ता मिसाळ लता शिंदे,कुडपाने आशा जाधव किशोरी चेऊलकर व इतर महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात