खालापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी जाहीर,खालापूर शहर अध्यक्ष पदी दीपक जगताप
पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप
खालापूर : ७ डीसेंबर
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वामध्ये खालापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी पुढील तीन वर्षा करिता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे.यावेळी प्रवीण जांभळे व रवी पाटील यांच्यावर सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली.तसेच संजय देशमुख, समीर म्हात्रे, हेमंत पाटील, किशोर देवघरे हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे.
राखी गणेशकर या महिला उपाध्यक्ष असतील. चिटणीसांच्या मध्ये चिंतामण पाटील, विकास रसाळ,प्रभाकर सांगळे, यशोदा सचिन मोरे, ताई पुंडलिक पवार व अश्विनी माळी यांना जबाबदारी देण्यात आली.ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण पार्टे यांच्यावर खजिनदार महिला मोर्चा अध्यक्षपदी सुजाता पाटील,युवा मोर्चा अध्यक्षपदी नागेश पाटील,अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी राजेंद्र जमदाडे,विविध सेल आणि प्रकोष्ट कामगार आघाडीचे तालुका संयोजक म्हणून सचिन जाधव
जैन सेल संयोजक - सागर ओसवाल, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे संयोजक - दिगंबर सणस, सहकार सेल संयोजक - संजय पवार, ट्रान्सपोर्ट सेल - हरिभाऊ जाधव ,प्रज्ञा प्रकोष्ठ, हेमंत गीध, दिव्यांग सेलच्या संयोजक पदी मंगेश पार्टे, कायदा असेल संयोजक म्हणून संदेश वनगे, रेल्वे प्रवासी संयोजक म्हणून गौरव प्रकाश कदम, उद्योग आघाडीचे संयोजक म्हणून रवींद्र मोरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.खालापूर शहर अध्यक्ष पदी दीपक जगताप व चौक शहर अध्यक्ष पदी गणेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लवकरच इतर पदाधिकारी व जिल्हा परिषद, पंचायत समिती वार्डाचे अध्यक्ष देखील घोषित करण्यात येतील. या कार्यकारिणीचे अनेकांनी स्वागत केले असून जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे संपर्क प्रमुख राजेश गायकर जिल्ह्याचे उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, सनी यादव, माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक काशिनाथ पार्टे यांसह अनेकांनी या कार्यकारिणीचे स्वागत केले आहे
0 Comments