(मे.इंटेलिजेंट सप्लाय चैन इन्फास्ट्रक्चर मॅनेजमेंट प्रा. लि.विरोधात स्थानिकांचा एल्गार)
स्थानिकांवरील अन्याय सहन करणार नाही.....सरपंच प्रमोद शिर्के
पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
वावोशी / खोपोली १६ जानेवारी ,
खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागात जांभिवली ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या मे.इंटेलिजेंट सप्लाय चैन इन्फास्ट्रक्चर मॅनेजमेंट प्रा. लि.या कारखान्यात मागील तीन वर्षांपासून काम करीत असलेल्या स्थानिक कामगारांना पगारवाढ करण्यात आली नाहीच मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांची पिळवणूक करण्यात येत असल्याने हे सर्व प्रकार तात्काळ थांबविण्यात आले नाहीत तर मात्र कंपनी व्यवस्थापकांच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने आवाज उठविणार असल्याचे जांभिवली ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच प्रमोद शिर्के यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मे.इंडोस्पेस कंपनीच्या ठेकेदार विरोधात शिवसेनेसह स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना न्याय द्या अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा कामगार नेते तथा सरपंच प्रमोदभाई शिर्के यांनी कंपनी विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत. मे.इंडोस्पेस कंपनी मध्ये कामगारांनावर होणाऱ्या अन्यायाविरोधात खालापूर तालुका शिवसेना, कामगार सेना, ग्रामस्थ जांभीवली ग्रामपंचायत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
कामगार नेते तथा सरपंच प्रमोदभाई शिर्के यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली आंदोलनाची भूमिका आक्रमकपणे जाहीर केली आहे.खोपोली - पेण राष्ट्रीय महामार्ग लगत जांभीवली ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या इंडोस्पेस कंपनी मधील कामगारांच्या प्रश्नावर तसेच स्थानिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.कंपनी, ठेकेदार प्रशासनाकडून कामगार कायज्ञाचे उल्लंघन होत असून किमान वेतनसह कामगारांना त्यांच्या हक्काच्या मिळणाऱ्या अनेक वेगवेगळ्या गोष्टीबाबत प्रमोद शिर्के यांनी आवाज उठवला आहे.
गेली तीन वर्ष पगार वाढ़ झालीच नाही,एस एल,सी एल, पी एल बाबत उदासीनता, कंपनीत काम करताना हाफ डे दिला जात नाही, कामगार स्वतः किंवा घरातील व्यक्ति आजारी असेल तर सुट्टी दिली जात नाही,फूड पॅकिंग मध्ये माल कमी आढळयास सर्व कामगारांनाची पगार कपात केली जाते. आठ तास ड्युटी असतानाही जादा एक तास काम करून घेतले जाते,कंपनीत काम करताना दुखापत झाल्यास कामगाराला स्वतः खाजगी गाडी करून जावे लागते तर हॉस्पिटल खर्च ही कामगारानाच करावा लागतो ,कामगारांनी काही वयक्तिक कामाकरिता कामावर न आल्यास कामावरून कमी करण्याची धमकी देऊन राजीनामा लिहून घेतला जातो,इन्सेन्टिव्हचे पैसे दिले जात नाही, चहा नास्ताचा दर्जा सुमार असतो,बोनस दिला जात नाही, कामगारांची सुरक्षा तसेच आरोग्य बाबत दुर्लक्ष केले जाते अश्या अनेक समस्यांचा पाढाच सरपंच प्रमोद शिर्के यांचेसह महिला - पुरुष कामगारांनी वाचला.
तसेच कंपनीत ट्रान्सपोर्ट, लोडींग अनलोडींग,कॅन्टींग, स्क्रॅप,स्टेशनंरी व पॅकेजिंग मटेरियल, टुरिस्ट वाहने आदी ठिकाणी बाहेरील लोकांना काम दिले जाते मात्र स्थानिक गावकऱ्यांना यातील एकही काम मुद्दामून दिले जात नाही असेच शिवसेना कामगार नेते,सरपंच प्रमोदभाई शिर्के यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं.
इंटलीजन्स सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रा. ली कंपनी कडून एक्सप्रेस एच आर या ठेकेदार मार्फत ज्या ज्या कामगारांनाच्या हक्काच्या सोई सुविधा तसेच कामगार कायाद्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी बंधनकारक आहेत अश्या कोणत्याच गोष्टींचे पालन होत नसून आम्ही आमच्या कामगारांवर आणि स्थानीकांवर होणाऱ्या अन्याया विरोधात जिल्हा, तालुका, कामगार, पोलीस प्रशासनाला लेखी पत्र निवेदन दिले आहे. येत्या 23 जानेवारी पूर्वी संबंधित ठेकेदार यांनी या बाबत बैठक घेऊन यावर मार्ग काढावा अन्यथा 23 तारखेपासून कंपनी गेट बाहेर सर्व कामगारांना, गावकऱ्यांना घेऊन न्याय आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली हक्कासाठी शिवसेना पक्ष, कामगार सेना आंदोलन करणार असा इशारा आजच्या पत्रकार परिषदेत शिवसेना कामगार नेते, सरपंच प्रमोदभाई शिर्के यांनी दिला.
कारखानदारीला आमचा विरोध नाही. कंपनी मोठी व्हावी हीच आमची इच्छा आहे परंतु कामगारांना त्यांच्या हक्काचे मिळायला हवे. नाहक आणि पिळवणूक पद्धतीने ठेकेदार कामगारांनावर अन्याय करीत असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही. ठेकेदार यांनी दादागिरी कामगारांनावर करू नये ती पक्ष सहन करणार नाही. कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षितात याबाबत कोकण भवन येथील ऑद्योगिक सुरक्षा संचालक यांनी तात्काळ याची दखल घेऊन कार्यवाही करावी तसेच कामगार आयुक्त स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन यावर न्याय द्यावा अन्यथा आमदार महेंद्र थोरवे यांच्या आदेशानुसार पक्ष न्याय मिलेपर्यंत शांत राहणार नाही - ऍड.अमोलराजे बांदल-पाटील, पक्ष प्रवक्ते, उत्तर रायगड यावेळी महिला कामगारांनी ही आपल्या व्यथा बोलून दाखवल्या. नाहक मानसिक त्रास दिलं जातं या बाबत सांगितलं. तर कामगारांनी ही आपल्या अडचणी आणि आपल्यावर होणारा अन्याय पत्रकारांसमोर बोलून दाखवला.
आजच्या पत्रकार परिषदेला कामगार नेते सरपंच प्रमोदभाई शिर्के, पक्षाचे प्रवक्ते ऍड. अमोलराजे बांदल-पाटील, युवासेना पदाधिकारी प्रितेश मोरे, कामगार सेनेचे तालुका उपाध्यक्ष नरेंद्र पाटील आदीनसह पक्षाचे अन्य पदाधिकारी, उपसरपंच, सदस्य, जांभीवली, आजीवली ग्रामस्थ तर मोठ्या संख्येने कामगार वर्ग हजर होता. यावेळी कामगारांनी कामगार एकजुटीचा विजय असो अश्या घोषणाही दिल्या.
0 Comments