काटरंग येथील राहत बिल्डिंग परिसरातील सांडपाणी रस्त्यावर..
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर...
झाडाखाली असणाऱ्या आप च्या शिबिरात नगरपरिषदेने उपाययोजना करण्यासाठी नागरिकांचे आपला साकडे
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : १२ जानेवारी ,
खोपोली नगरपालिका हद्दीतील काटरंग विभागातील राहत बिल्डिंग, वैभव वृंदावन व अन्य बिल्डिंगसाठी सांडपाण्याचे पाणी जाण्याची व्यवस्था नसल्याने सदर पाणी हे संपूर्णपणे रस्त्यावर येत असून आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.दोन वर्षांपासून सदर सोसायटी मधील नागरीक पाठपुरावा करीत आहेत.खोपोली नगरपरिषदेकडे सदर पीडित रहिवाशांनी दि. ५ एप्रिल २०२३ रोजी विनंती अर्ज करूनही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे.आम आदमी पार्टी च्या झाडाखाली असणाऱ्या समस्या निवारण शिबिरात अर्ज देवून सदर समस्या दुर करण्याची मागणी केली आहे.
सदर हे निवेदन दिल्यानंतर तातडीने यांचा पाठपुरावा केला जाइल,नागरिकांची समस्या,सोडविणे या पक्षाचे धोरण असुन आज पर्यंत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.सदर ही समस्या गंभीर असून,नागरिकांसाठी विविध आजारांना निमंत्रण देणारी आहे.यामुळे तातडीने तुमची समस्या मार्गी लावण्यांचे अश्वासन यावेळी देण्यात आले.
पीडित नागरिकांच्या वतीने प्रशासनास आपच्या वतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल,सदर गैरसोय दुर न केल्यास आपच्या माध्यमातून आंदोलन करून हा प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवला जाईल असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी केले आहे. यावेळी दिपक कांबळे, शाहनवाज सय्यद, भगवान पवार,दमण सिंघ तसेच स्थानिक सोसायटी मधील ॲड.शैलेश पालांडे,शिवाजी मिरकुटे,प्रमोद पाटील, किरण पाटील, नागटिळक मॅडम आदी उपस्थित होते.
0 Comments