मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर आयसर टेम्पोने दिली अज्ञात वाहनाला धडक,दोन जण जागीच ठार....
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : १९ जानेवारी,
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे एका आयसर टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पो मधील चालक आणि क्लिनर जागीच ठार झाला आहे,
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याहून मुबंई कडे आयसर टेम्पो माल घेऊन जात असताना तो बोरघाटात आडोशी गावाच्या हद्दीत आला असता चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली, यात टेम्पो मधील चालक (अनिल लाखंन गावित, वय २७ वर्ष रा सिलवास दादर हवेली ,( अनिकेत राजू बोरसा सिल्ववा, वय २४ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला ,यात टेम्पोची केबिन पूर्णपणे दबल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,
0 Comments