खोदकामाची माती,लोखंडी पाईप,रस्त्यालगत ,नागरि
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वाशिवली : २१ फेब्रुवारी,
आज जिकडे तिकडे खोदकामाचे ग्रहण सुरु आहे.रस्ते चांगले झाले की विविध कामासाठी खोदकाम केले जाते,परिणामी याच्या पासून अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. सावरोली - खारपाडा या रस्त्यावर वाशिवली येथे,एम.आय.डी.सी च्या माध्यमातून या परिसरात नव्याने निर्माण होणारे कारखाने यांस पाण्यांची अवश्यकता मोठी भासत असल्यामुळे पाईप लाईन टाकण्यात आली.मात्र सर्व नियमांची पाय मळणी करुन काम सुरु असल्यामुळे वहान चालकांस त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्याच्या नजदिक केलेले खोदकामाची माती दगड,तसेच लोखंडी पाईप रस्त्याच्या बाजुला ठेवण्यात येत असल्यामुळे,परिणामी या मार्गावरून प्रवास करतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी कोठेही खोदकाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे.नेट वर्क केबल किंवा गॅस लाईन अश्या विविध माध्यमातून रस्त्याच्या बाजुला खोदकाम होत असल्याचे दिसत आहे.काही वेळा रस्त्याच्या मध्यभागी ही खोदकाम केले जात असल्यामुळे काम पुर्ण होताच निवळ ग्रामस्थांची समजूत काढावी म्हणून काम केले जाते.परिणामी या मार्गावर केलेल्या खोदकामामुळे नागरिकांना या मार्गावरून प्रवास करतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या ठिकाणी एम.आय.डी.सी च्या माध्यमातून पाण्यांची पाईप लाईन टाकण्यांचे काम मागील वर्षापासून सुरुच आहे.यामुळे या ठिकाणी खोदकाम केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या ठिकाणी मोहपाडा येथिल बाजार पेठ जवळ असल्यामुळे या ठिकाणी शेकडो हून अधिक नागरिक या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतात.परिणामी या ठिकाणी खोदलेली कामाची माती,रस्त्यालगत ठेवण्यात आलेले मोठ - मोठे पाईप यामुळे या ठिकाणी प्रवास करतांना जणू तारेवरची कसरत करावी लागत आहे.
0 Comments