मराठ्यांच्या मागण्या मान्य,तालुक्यात गुलाळ,फटाके,पेढे वाटून साजरा

 मराठ्यांच्या मागण्या मान्य,तालुक्यात गुलाळ,फटाके,पेढे वाटून साजरा 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खोपोली : २७ जानेवारी,

                  गेले अनेक महिने अनेक वर्ष मराठे अरक्षणांपासून वंचित होते.मात्र मराठ्यांचा योद्धा म्हणुन अंतरावली सराटी मधून मनोज जरांगे पाटील यांनी अरक्षणांचे रणशुंग फुकले,यासाठी त्यांनी अनेक वेळा अंदोलने केले.संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला मराठ्यांना जागृत केले.अनेक ठिकाणी सभा घेतल्या, सरकारला २५ फ्रेब्रूवारी ही तारिख जाहिर केली,या साठी मोर्चा काढण्यात आले.यावेळी  महाराष्ट्रातील असंख्य मराठे बांधव या मोर्चे मध्ये सामिल झाले, संपुर्ण रस्त्यावर मराठे उतरले हे सर्व वाशी मध्ये असतांना शिंदे सरकार यांनी अध्यादेश काढून मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्यावर संपुर्ण महाराष्ट्रात गुळाल,फटाके,पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

             

              विजश्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना न्याय मिळावा यासाठी पद यात्रा काढून आजाद मैदान मुंबई येथे जावून उपोषण सुरु करणार होते.जवळ- जवळ वाशी येथे पोहचले असतांना, शिंदे सरकार यांचे शिष्टमंडळ यांनी जरांगे यांस आमचे सरकार सकारात्मक विचार करीत असून आपल्या अटी मान्य करण्यांस तयार असल्यांचे बोलले गेले,अखेर आज मराठ्यांना शिंदे सरकार यांनी अध्यादेश काढून मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्या अशेचे पत्र त्यांच्या हाती सुपुर्त करण्यात आले.यावेळी संपुर्ण मराठा समाज रस्त्यावर ऐऊन आनंदोत्सव साजरा केला 
           

              मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आज शेकडो वहाने आपल्या परतीच्या प्रवासाला लागले असल्यांचे पहावयांस मिळत होते.यावेळी वहानामध्ये असलेले  मराठे बांधावांनी घोष वाक्य देवून पुढे जात असल्यांचे पहावयांस मिळत होते.आज शिळफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा बांधवांनी हातात गुलाळ,मुखात घोष वाक्य ,आणी फटाक्याच्या अतिष बाजीत येथिल मराठ्यांनी जल्लोष साजरा केला.यावेळी सकळ मराठा राज्य समनव्यक- सुनील पाटील,
गृप ग्राम पंचायत माजगांव उप सरपंच राजेश पाटील,किरण हडप,चंदू फावडे,उत्तमशेठ भोईर,मनेश यादव,मंगेश दळवी,संदीप पाटील, जे.पी. पाटील,राहुल गायकवाड,अमोल जाधव,संतोष देशमुख,संदीप पाटील,धनश्री मोरे,कविता रुपाली जाधव,विनिता कांबळे,पाटील,भरत पाटील,भास्कर लांडगे,विनोद रजपूत,भाऊ सणस,संकेत हडप,अनिल मिंडे,अदि उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर