मराठा आंदोलनाचा मोठा विजय,पेढे,फटाके फोडून तालुक्यात साजरा

 मराठा आंदोलनाचा मोठा विजय,पेढे,फटाके फोडून तालुक्यात साजरा  



पाताळगंगा न्यूज : समाधान दिसले 
खालापूर : २७ जानेवारी,

                मराठ्यांना अरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील,विराट मोर्चा काढण्यात आला.अंतरावली सराटी मधून निघालेला मोर्चा,रायगडजिल्हा सह संपुर्ण महाराष्ट्रातील मराठी बांधव या मोर्चात सहभागी झालेले पहावयांस मिळाले,त्यांच्या साठी भाकरी,भाजी अपुलकीने या बांधवांस देत होते.हा मराठा अंदोलनांचा मोर्चा वाशी येथे येताच शिंदे सरकार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यांचे सांगितले आणी अध्यादेश  देण्यात आल्यांने संपुर्ण मराठा बांधवांच्या चेह-यावर एक समाधानांचे हास्य पहावयांस मिळाले,त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यात पेढे,फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

            मराठा आंदोलन समोर नमते होवून अखेर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले.या मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं असून,नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित विजयी सभा पार पडल्याने सर्व सकल मराठा समाज बांधवांन मध्ये  खोपोली शहर शिंदे गट शिवसेनेच्या वतीने हा आंनद उत्सव खोपोली शहरातील शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून हा आंनद उत्सव साजरा केला, यावेळी मोठया घोषणा देण्यात आल्या.

                   यावेळी विधानसभा प्रवक्ते ॲड.अमोलराजे बांदल पाटील, शहरप्रमुख संदीप पाटील, राहुल गायकवाड, राजू गायकवाड, रुपेश देशमुख, विवेक पाटील, सचिन गुरसाळ, हरेश काळे, अनिल मिंडे, चंदू फावडे आदि प्रमूख पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

 वै. ह.भ.प. सुलोचना दत्तात्रेय पाटील ह्यांचे अकस्मात   निधन