गारमाळ शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न, तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाही उत्साहात संपन्न

 गारमाळ शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न, तर  विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाही उत्साहात संपन्न 





पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : २७ जानेवारी,


                    २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद शाळा गारमाळ शाळेचा  सांस्कृतिक आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला,यावेळी सकाळी उपसरपंच सुखदेव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, शालेय विद्यार्थ्यांनी  बसविलेल्या सांस्कृतिक गाणी, देशभक्ती गीते, कोळीगीतावर नृत्य सादर केले, 
              तर वर्षभरात विविध स्पर्धात घवघवीत यश मिळवलेला विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, अतिशय दुर्गम भागात असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यश आणि सांस्कृतिक डान्स चांगल्या प्रकारे केल्याने ग्रामस्थांनी शिक्षकांचे आभार मानले आहेत, 
                   यावेळी उपसरपंच सुखदेव भोसले ,ग्रामपंचायत सदस्या संगीता संदीप चिंचावडे, मुख्याध्यापिका सविता दारशेवाड, शिक्षिका श्रुतिका चिले, सुनंदा भोसले, रुपाली चिंचावडे,जेष्ठ नागरिक विष्णू चिंचावडे, गबलू भोसले, गणेश आखाडे, मारुती शेडगे, संतोष शेडगे, शैलेश तुपे, संदीप तिकोने, निलेश चिंचावडे, बबन जानकर, प्रकाश आखाडे, आदींसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर