पत्रकार मनोज कलमकर यांना मातृशोक
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर : २९ जानेवारी,
पत्रकार मनोज कळमकर यांच्या मातोश्री कै.प्रभावती मधुकर कळमकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ब्याऐंशी वर्षे होते. अतिशय धार्मिक वृत्तीच्या प्रभावती यांनी अनेक तीर्थक्षेत्र केले होते.ईश्वर भक्तीवर मोठी श्रद्धा होती.त्याच बरोबर,मुलांवर उत्तम संस्कार आणि शिक्षण याकडे त्यांचे विशेष लक्ष होते.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना,एक मुलगी, जावई, पणतू असा मोठा परिवार आहे.
दशक्रिया विधी २९ जानेवारीला होणार असून उत्तरकार्य १ फेब्रुवारीला राहत्या घरी खालापूर येथे होणार आहे. यावेळी ह.भ.प. महादेव सिताराम महाडिक चिंचवली यांची प्रवचन सेवा होणार आहे.
0 Comments