वयाल येथील स्वयंभू गणपती ठरत आहे भक्तांचे श्रद्धास्थानं,माघी गणपती उत्सवाची भजनाच्या माध्यमातून सांगता
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
पाताळगंगा : १३ फेब्रुवारी,
गणपती उत्सव हा मराठी महिन्यातील माघ महिन्यात येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव साजरा करण्यात आला.विशेष करून ग्रामीण भागातील तरुण वर्ग हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्याची एक वेगळीच परंपरा आहे.गेली दहा वर्ष वयाल येथे पाताळगंगेच्या तीरावर असलेले स्वयंभू गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
या स्वयंभू गणपतीची आख्यायिका येथील ग्रामस्थ सांगताना म्हणाले की,वयाल येथे स्वयंभू गणपतीची मुर्ती शनी ची मूर्ती तसेच शिवलिंग अश्या काही मूर्ती येथे सापडल्या,मात्र या मूर्ती येथे कश्या आल्या हे अजूनही न उमगलेले कोडे आहे.पूर्वी या ठिकाणी मोठे जंगल असल्यामुळे येथे कोणीही येत नसे.मात्र गेल्या पन्नास साठ वर्षांपूर्वी येथे काही मूर्ती असल्याचे येथील ग्रामस्थ यांच्या निदर्शनास आले.तसेच काही मुर्त्यांची अवशेष पाताळगंगे मध्ये विसर्जित करण्यात आले असल्याचे येथील ग्रामस्थांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.
या मूर्तीची मनोभावे पूजा केल्यामुळे आलेले संकट दूर होते आपल्याला सुख शांती लाभेते अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.या ठिकाणी सुंदर मंदिर बांधायला हवे असा विचार दहा वर्षांपूर्वी येथे मंदिर बांधण्याचा संकल्प करण्यात आले.मात्र मंदिर बांधत असताना विघ्न आले.शिवाय अपघातही घडला गेला.मात्र असे का होते यासाठी पुरोहिताला सांगून यावरती उपायाचा म्हणून येथे मंदिर न बांधता फक्त चारी बाजूनी भिंत बांधावी कारण या ठिकाणी शनी देवाचा निवास आहे.यामुळे येथील ग्रामस्थांनी मूर्ती हात न लावता या ठिकाणी चारी बाजुंना भिंत बांधण्यात आली.

तसेच प्रत्येक अमावस्याला महाप्रसाद पूजा,अर्चाही होत असते.पावसाळ्यात पावसाचे पाणी पाताळगंगेला खूप येत असते.मात्र गाभा-याला हे पुराचे पाणी स्पर्श होत नसल्यांचे ग्रामस्थांनी सांगितले.ज्या दिवसापासून येथे पूजा अर्चा सुरु झाली त्या दिवसापासून गावातील कलह शांत झाले.शिवाय माघी गणपती उत्सवाच्या निमित्ताने भजन पूजा अर्चा होम हवन,आरती,असे विविध कार्यक्रम होत असते.तसेच या ठिकाणी येणारे प्रत्येक भक्तगणनां या दिवशी महा प्रसाद देण्याचे काम संत सेवा तरुण मंडळ वयाल हे करीत आहे.
0 Comments