महडच्या अष्टविनायक मंदिरात गणेश जन्मोत्सव साजरा ,उत्सवात धान्यांची रांगोळी ची भर भक्तातांचे वेधले लक्ष्य
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
महड : १३ फेब्रुवारी,
गणपती उत्सव हा मराठी महिन्यातील माघ महिन्यात येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव साजरा करण्यात येतो.विशेष करून महराष्ट्रात असलेल्या अष्टविनायक मंदिरात भाविक भक्ताची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यांने या वरद विनायाकाचे दर्शन घेण्यासाठी या ठीकाणी यात्रे सारखे प्रचंड स्वरूप प्राप्त झालेले होते.मुंबई -पुणे महामार्गावर असलेले अष्टविनायका पैकी महड गावातील वरद विनायक येथे गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
माघी गणपती उत्सवाच्या निमित्ताने महड येथील मंदिरात भव्य दिव्य अशी धान्याची रांगोळी ( वरद विनायक फुल रांगोळी मंडळ )यांनी साकारली,रांगोळी चे सुंदर असे दृश भक्तगणांनाचे मन आकर्षिले जात होते. आणि आपल्या जवळ असलेल्या मोबाइल.मध्ये टिपण्याचा प्रयत्न करीत होते.अशीच सुंदर रांगोळी रवि आचार्य (नेरळ ) आणि मंगेश देशमुख ( मानकीवली )तुळशीराम ठोंबरे - टेंभरी,सचिन पाटील - कलोते,स्वरा सचिन पाटील,स्नेहल देशमुख,साक्षी देशमुख,कविता देशमुख,तसेच रांगोळी साठी अर्थ सहाय्य नित्यराज चुडासमा ( अहमदाबाद ,गुजरात यांनी दिले.या रांगोळीचे अनावरण नायब तहसीलदार खालापूर पवार तसेच विश्वस्थ श्रीधार्थ जोशी यांच्या हस्ते झाले.
रांगोळी काढण्यासाठी ८० किलो धान्यांचा वापर करण्यात आला.तसेच ह्या रांगोळी साठी वीस तास एवढा कालावधी लागला.या रांगोळी साठी शाबुदाणे, कणी,बाजरी,तीळ,यामध्ये हिरवा,पिवळा,लाल,पांढरा,निळा असे कलर्स वापरण्यात या रांगोळी मध्ये जय श्री राम,श्री समर्थ रामदास स्वामी,छत्रपती शिवाजी महाराज,एकविरा आई यांचे चित्र रांगोळी च्या माध्यमातून रेखाटण्यात आले.
0 Comments