शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस सुरू करा. अन्यथा आंदोलन करणार : आप
माय मराठी न्युज : वृतासेवा
खोपोली : ११ सप्टेंबर
खोपोली नगरपरिषद हद्दीतील शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस हे पावसाळ्यात पाण्याच्या गळतीमुळे बंद करण्यात आले होते.मात्र याचाच फटका शिळफाटा व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना खोपोली शहरात आपले पोस्ट करण्याकरिता जावे लागत आहे. त्यामुळे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
शिळफाटा येथील पोस्ट ऑफिस हे मागील चार महिन्यापासून बंद आहे व त्यामुळे सर्व नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तरी सदर पोस्ट ऑफिस तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन केले जाईल असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ.रियाज पठाण यांनी सांगितले.
पोस्ट ऑफिस हे गळत असल्याकारणाने बंद करण्यात आलेले असून आम्ही नवीन जागा शोधत आहोत अशी माहिती अधिकाऱ्यांमार्फत मिळालेली आहे.
पोस्ट ऑफिस हे गळत असल्याकारणाने बंद करण्यात आलेले असून आम्ही नवीन जागा शोधत आहोत अशी माहिती अधिकाऱ्यांमार्फत मिळालेली आहे.
0 Comments