जिल्हा परिषद शाळा जांभवली येथे वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न

 जिल्हा परिषद शाळा जांभवली येथे वार्षिक  संमेलन उत्साहात संपन्न

     



पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : २९ फेब्रुवारी,

               खालापुर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा जांभवली येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच त्यांच्या असणाऱ्या सुप्त गुणांची दखल घेऊन रायगड जिल्हा परिषद शाळा जांभवली येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
              यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गायकर व पोलीस अंकुश म्हात्रे तसे दशरथ गावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सभासद यांचे स्वागत करण्यात आले तसेच सर्व पालक वर्गांचे देखील स्वागत करण्यात आले.केंद्रस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेतील नंबर आलेल्या  विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती कडुन सत्कार करण्यात आला.
             सदर कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना कै. पै. शिवाजी राळे विद्या विकास व क्रीडा प्रतिष्ठान कोये यांच्यामार्फत सन्मानचिन देण्यात आले.कार्यक्रमात इतिहास आणि आधुनिक संस्कृती चे दर्शन घडविणारी लोकगीते, तसेच स्वच्छतेचा संदेश देणारे नाटक घेण्यात आले.नृत्यदिग्दर्शन उपशिक्षिका  संध्या लोणकर  यांनी केले.
              सदर कार्यक्रमासाठी खालापूर तालुका शिक्षक सेनेचे अध्यक्ष  जितेंद्र ठाकूर , चौक नवीन वसाहत शाळेचे मुख्याध्यापक  विश्वास सावळे  अमित मिडगुले  , धोंडखर शाळेचे मुख्याध्यापक शरद राळे ,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गायकर, पोलिस अंकुश म्हात्रे, कृष्णा गावडे, आण्णा गावडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा सानप, उपशिक्षिका संध्या लोणकर यांच्यासह    ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,   पालक व गावातील ग्रामस्थ  उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा सानप यांनी केले तर आभार उपशिक्षिका संध्या लोणकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण