४ मार्च ला भव्य मोर्चाचे नियोजन,लाखोच्या संख्येने स्थानिक सहभागी होण्यांचे संकेत

 जैव प्रकल्पास पाताळगंगा परिसरातील स्थानिकांचा  विरोध, ४ मार्च ला भव्य मोर्चाचे नियोजन,लाखोच्या संख्येने स्थानिक सहभागी होण्यांचे संकेत 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
बोरीवली : २९ फ्रेब्रूवारी 

            पाताळगंगा या परिसरात अनेक कारखाने असून या पासून येथिल स्थानिकांना कोणताही त्रास नाही.मात्र बोरीवली येथे येणारा जैव प्रकल्प हा आपल्या मुळावर उठणार असल्यामुळे येथिल ग्रामस्थांनी विरोध दर्शविला कारखाना असावा मात्र आपला जिव घेणी नसावा हा  प्रकल्प या ठिकाणी स्थापण झाल्यांस येथिल पर्यावरणांचा समतोल ढासळला जाईल,संपुर्ण परिसर या कारखान्यामुळे तिव्र वासाचा त्रास सहन करावा लागेल,शिवाय आपणांस शारिरिक व्याधी निर्माण होणार असल्यांचे येथिल स्थानिकांचे म्हणणे आहे.यामुळे ४ मार्च रोजी लाखोच्या संख्येने मोर्चा काढणार असल्यांचे संकेत मिळत आहे. 
           हा प्रकल्प गोवंडी येयून हाय कोर्टाने हा प्रकल्प हळविण्यांचे आदेश दिल्यामुळे बोरीवली येथे येत असल्यामुळे गेले काही दिवस ग्रामस्थांनी या प्रकल्पास विरोध दर्शविला असून ४ मार्च रोजी लोखोच्या संख्येने मोर्चा निघणार असल्यांचे समजते.तरुणांना रोजगार हवा मात्र जीव घेणी प्रकल्प नसावा असा ठराव पाताळगंगा या परिसरातील ग्राम पंचायत यांनी घेतला आहे.प्रकल्पास पुर्ण विरोध असून वेळ पडल्यांस तस्त्यावर उतरुण अंदोलन करण्यांची वेळ निर्माण झाली आहे.यामुळे आतच जागृत व्हा असे अवाहान या प्रकल्प समिती आणी ग्रामस्थ देत आहे.
              आजची तरुण पिढीच्या हातात भविष्य असतांना या जैव प्रकल्पामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असल्यामुळे असला कारखान्यास पुर्ण पणे विरोध असल्यांचे दिसून येत आहे.म्हणुनच आताच ही वेळ आली असून लाखोच्या संख्येने या मोर्चा मध्ये ग्रामस्थांचा सहकार्य लाभत असल्यांचे दिसून येत आहे.त्याच बरोबर या परिसरातील ग्राम पंचायत यांनी हा प्रकल्प या ठिकाणी नको असे असा ठरावा घेण्यात आला.हा प्रकल्प या ठिकाणी निर्माण झाल्यांस अनेक आजारांचा सामना करावा लागेल त्यातच प्रत्यकांची घरची स्थिती उत्तमच असे नाही.यामुळे एखादा आजर निर्माण झाल्यांस सामन्य माणूस काय करेल म्हणून  हीच वेळ आहे ती एकजुट होण्यांची...

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण