राजिप शाळा वडगांव येथे,कंपोस्ट प्लॅन्टर निर्मिती,परसबागेतील झाडांना मिळणार सेंद्रिय खत

 राजिप शाळा वडगांव येथे,कंपोस्ट प्लॅन्टर निर्मिती,परसबागेतील झाडांना मिळणार सेंद्रिय खत 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगाव : १४ फ्रेब्रुवारी 
  
            आज दिवसभरातून घरामधून,कारखान्यातील कॅंटिंग,हॉटेल,रेस्टॉरंट,मधून विविध प्रकारचे अन्न वाया जात असते.मात्र तुरळक ठिकाणी यांचा खते तयार केले जाते.यांचा उपयोग आपल्यासाठी कंपोस्ट किंवा इंधन निर्मिती करू शकतो.मात्र तसे कोणीही आचरणात घेत नाही उलट उरलेले अन्न वाया घालविले जाते,किंवा घंटागाडी यामध्ये टाकले जाते,परिणामी हेच अन्न कुजल्यामुळे दुर्गंधी पसरली जाते.मात्र यांचा उपयोग आपण खते म्हणून करू शकतो यांचं बाबींचा अभ्यास करून राजिप शाळा वडगांव येथील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या संकल्पनेतून हा कंपोस्ट प्लॅन्टर निर्मिती चा प्रोजेक्ट तयार करण्यात आले.
             

  राजिप शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत जेवण मिळत असल्यामुळे शिल्लक राहिलेले अन्न अथवा विद्यार्थ्यांच्या ताटामधील अन्न वाया जात असते.मात्र शिल्लक राहिलेल्या अन्नावर प्रक्रिया करून त्यांचे खत निर्मिती करू शकतो.या बाबींचा अभ्यास करून, शाळेतच होणार कंपोस्ट खताची निर्मिती,करून भाजीपाला, झाडांना दिल्यांस आपण रासायनिक खते न देता उत्तम सेंद्रिय खते त्यांस मिळाल्यामुळे साहजिकच आपल्या शरीरात रासायनिक खताचा संक्रमण होणार नाही.या सर्व बाबींचा अभ्यास करून या प्रोजेक्ट ची निर्मिती करण्यात आली.  
              प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहारातील शिल्लक अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी व कचऱ्याबाबत निष्काळजीपणा मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर टप्पा २ च्या अभिनव उपक्रमांतर्गत मा.सरपंच, ग्रुप ग्राम पंचायत वडगाव -  गौरी महादेव गडगे, रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे, कंपोस्टर प्लॅन्टर बसविण्यात आले.यावेळी मिनल गडगे(नोव्होझोम्स),चव्हाण ,भालेराव INORA,मुख्याध्यापक सुभाष राठोड,सह शिक्षक वैजनाथ जाधव सर,विषय शिक्षिका सरस्वती कवाद मॅडम, नीता राऊत अंगणवाडी सेविका व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
 

चौकट 
          शाळेत शक्यतो अन्न शिल्लक राहत नाही,तरीसुद्धा राहिल्यास ते अन्न वाया जाऊ नये म्हणून व त्यापासून कंपोस्ट खत तयार करता यावा या हेतूने सादर चे कंपोस्ट प्लॅन्टर बसविण्यात आले.शाळेतूनच स्वच्छतेविषयीची जाणीव व लोक जागृती व घनकचऱ्याचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावे,ओला व सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खताची निर्मिती करून त्या खताचे परसबागेची उपयोग म्हणून हा अभिनव उपक्रम राबविला मुख्याध्याप रा.जि.प.शाळा,वडगाव  सुभाष राठोड

चौकट 
शाळेपासून या उपक्रमाची सुरुवात केली तर गावात लवकर प्रसार होईल व गाव कचरामुक्त करण्यास जनजागृती होईल.कचऱ्याबाबत निष्काळजीमुक्त महाराष्ट्र या स्वच्छता मॉनिटर टप्पा दोनसाठी पूरक उपक्रम आहे.मा.सरपंच ग्रुप ग्राम पंचायत वडगाव - गौरी महादेव गडगे

Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप