राजिप शाळा,वडगाव च्या नामफलक,कमान चे अनावरण, वार्षिक सनेहसंमेलन उत्साहात संपन्न

 राजिप शाळा,वडगाव च्या नामफलक,कमान चे अनावरण, वार्षिक सनेहसंमेलन उत्साहात संपन्न 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
वडगाव : १४ फेब्रुवारी,

            रायगड जिल्हा परिषद शाळा, वडगाव येथे शाळेच्या सुशोभीकरण योजनेतून ग्रुप ग्रामपंचायत वडगाव कडून नामफलक कमान बसवून, मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा फलक अनावरण तसेच शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मा.सरपंच गौरी महादेव गडगे,यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी वार्षिक स्नेहसंमेलनात २६ नृत्य सादरीकरण करण्यात आले.
             विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या कला द्विगुणीत व्हावी,यासाठी येथिल शिक्षकांनी हा उपक्रम हाती घेण्यात आले.यावेळी आपल्या जवळ असलेली कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली, कोलीगीते,तसेच गोंधळ,देशभक्ती असे विविध प्रकारचे नृत्यांचा अविष्कार करण्यात आले.यावेळी टाळ्यांनी आवाजाने हा परिसर गर्जून गेल्यांचे पहावयांस मिळाले,कोणतेही न्युनगंड न बाळगता आपली कला विद्यार्थ्यांनी सादर केली. 

                 यावेळी स्वयं सेविका निकिता गडगे,साक्षी जांभूळकर यांना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आले. तसेच शिक्षिका सरस्वती कवाद, सह शिक्षक वैजनाथ जाधव, सी.एस.आर च्या माध्यमातून व ग्रुप ग्राम पंचायत वडगाव च्या निधीतून शाळा भौतिक व डिजिटल करण्यात आल्यामुळे त्यांचे आभार मानले,त्याच बरोबर शैक्षणिक कामाबद्दल मुख्याध्यापक सुभाष राठोड यांना  सुद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.

              या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ग्रुप ग्राम पंचायत वडगाव मा.सरपंच गौरी गडगे,प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख केंद्र माजगाव मा.जे.पी.परदेशी, मुख्यध्यापक ,किरण कवाद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा करुणा ठोंबरे व उपाध्यक्षा राजश्री जांभूळकर,सर्व सदस्य,मोठ्या संख्येने पालक,ग्रामस्थ माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप