रिलायन्स कंपनी मधून सेवा निवृत्त,रमाकांत जाधव यांचा सामान्य वर्कर ते लोडींग ऑफिसर खडतर प्रवास

 रिलायन्स कंपनी मधून सेवा निवृत्त,रमाकांत जाधव यांचा सामान्य वर्कर ते लोडींग ऑफिसर खडतर प्रवास 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली ५ मे,

                    दहावीचे शिक्षण झाल्यानंतर रमाकांत सीताराम जाधव यांनी पाताळगंगा या परिसरातील नावलौखिक असलेली रिलायन्स या कारखान्यात कामाला रुजू झाले, सुरुवातीला कॉन्ट्रक मध्ये काम करीत असतांना दोन वर्षामध्ये म्हणजे १९९४ मध्ये ते कायम स्वरूपी कामगार म्हणून रुजू झाले, शिक्षण जरी अल्प असले तरी सुद्धा स्वताच्या कर्तृत्वावर आणि काम करण्याची आत्मीयता,त्यांची कामाची पद्दत, यामुळे त्यांना वेळोवेळी विविध काम बारकावे शिकत राहिले.यामुळे त्यांस उत्तम  कामगार या पुरस्कारांने सन्मानित करण्यात येत होते.त्यांचा हा खडतर प्रवासाने त्यांस  सामान्य वर्कर पासून ते लोडींग ऑफिसर या पदावर ते पोहचले होते. 

                  रिलायन्स या कारखान्यात जवळ - जवळ ३१ वर्ष सेवा बजावली,मात्र सुरुवातीचा काळ खूप कठीण आणि संघर्षमय असल्याचे त्यांनी सांगितले,पॉलिस्टर या प्लांट मध्ये १२ वर्ष काम करीत असतांना,नंतर  त्यांना स्पिनिंग ऑपरेटर म्हणून त्यांची बढती करण्यांत आली.मात्र हे तेथेच थांबले नाही.आपले काम प्रामाणिपणे पणे करीत असतांना येथिल व्यवस्थापक यांनी २०१२ मध्ये स्टाफ मध्ये समाविष्ट करण्यांत आले.पुढे ते लोडींग ऑफिसर या पदावर त्यांनी नियुक्ती करण्यांत आली.आज हे आपली सेवा बजावत असतांना या कारखान्यातून निवृत्त झाले.

                  रमाकांत जाधव या पाताळगंगा परिसरातील रिलायन्स कारखान्यातून निवृत्त होत असतांना त्यांच्या नातेवाईक मित्र परिवार यांनी त्यांच्या निवास स्थानी जावून भेट घेतली,यावेळी तुमचे उर्वरित आयुष्य सुखी समाधाने,आणि आनंदाने जावे अश्या शुभेच्छा देण्यांत आल्या,या पंचक्रोशीमध्ये सर्वांशी नम्रपणे वागणारे आणि राजकीय कारकिर्दीत सातत्याने सक्रिय असलेली व्यक्ती म्हणून त्यांच्या कडे आदराने पाहिले जात आहे.ते सेवा निवृत्त झाल्यांचे समजताच शेकडो मित्र परिवार यांनी त्यांस  शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन