आम आदमी पार्टी झाडाखाली असणाऱ्या शिबिराची सातत्यपूर्ण ३३३ दिवस...

 आम आदमी पार्टी झाडाखाली असणाऱ्या शिबिराची सातत्यपूर्ण ३३३  दिवस...



२५  फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्याच्या वतीने खोपोली येथे सभेचे नियोजन...

साजगाव ताकई रोडचे काम सुरू न झाल्यास २६  फेब्रुवारी पासुन खोपोली येथे बेमुदत साखळी उपोषण..
 
भारतातील झाडाखाली सदस्यता मोहीम व जन समस्या राबविणारा एकमेव राजकीय पक्ष....

रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांची संकल्पना देशात ठरते आहे एक आगळीवेगळी राजकीय ओळख...

पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खोपोली : १० फेब्रुवारी,
   
           आप मध्ये प्रवेश केलेल्या पहिल्या दिवसापासून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व नागरिकांना आम आदमी पार्टीत सामावून घेण्यासाठी खोपोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर  स्मारकासमोरील जांभळाच्या झाडाखाली रोज सकाळी ९  ते १०  या वेळेत नागरिकांशी संवाद साधण्याच्या उपक्रमाने वेगळी प्रतिमा तयार झालेली आहे.या ठिकाणी नागरीक नियमित असणाऱ्या नागरी समस्या सांगत असतात.व या समस्यांना सोडवण्याचे प्रयत्न आम आदमी पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी निरंतर होत आहे.आज आम आदमी पार्टी झाडाखाली असणाऱ्या शिबिराची सातत्यपूर्ण ३३३  दिवस पुर्ण झाले आहे. 
         

           आम आदमी पार्टी रायगड जिल्ह्यामध्ये प्रभावी कार्य करीत असतांना रायगड जिल्ह्यात खालापूर तालुका अध्यक्षपदी १५  मार्च २०२३  रोजी समाजकार्यातील अग्रगण्य नाव डॉ.शेखर जांभळे यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश झाला.समाजकार्यात सातत्यपूर्ण काम करणारा हाडाचा कार्यकर्ता,संकटात खंबीर पणे साथ देणारा देवदूत व रेकॉर्ड मॅन म्हणून डॉ.शेखर जांभळे यांची रायगड जिल्ह्यात वेगळीच ओळख आहे. सामाजिक कामात त्यांना रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्कार तसेच मानद डॉक्टरेट सुद्धा त्यांनी मिळवलेली आहे.
               जनतेला अगदी सुलभरीत्या उपलब्ध होणारा हा राजकीय पक्ष आता खोपोलीच्या घराघरात  पोहोचला आहे .नागरी प्रश्नांवरती तीन वेळा यशस्वी आंदोलन करून डॉ.शेखर जांभळे यांचे नेतृत्वाने एका शहराला राजकीय वळण दिले आहे. या झाडाखाली आत्तापर्यंत पाचशे पेक्षा जास्त नवीन सभासद देखील झालेले आहेत व  झाडाखाली राजकीय शिबिर घडवणारे देशातील पहिला राजकीय पक्ष म्हणून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद सुद्धा झालेली आहे .दिनांक १०  फेब्रुवारी २०२४  रोजी या शिबिराला ३३३  दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगड  जिल्हाध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक प्रश्नांवर वेळोवेळी उठाव करून नागरिकांना न्याय मिळवून देणारा हा पक्ष अशी आपची तळागाळात ओळख करून देण्यात यशस्वीता आलेली आहे.

                 शहरातील विविध प्रश्न आप ने सोडवून नागरिकांचा विश्वास जिंकलेला आहे.नुकताच साजगाव ताकई या प्रलंबीत रोडसाठी झालेले १३ दिवसीय बेमुदत साखळी उपोषण तालुक्यातील नागरी प्रश्नावर आवाज उठवण्याची नांदी ठरत आहे .या रोडच्या डांबरीकरण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊन लवकरच या रोडचे काम न  सुरू होईल असे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी सांगितले आहे .
             या शिबिरात तीनशे दिवसापासून अविरत मेहनत घेणारे आपचे  डॉ. रियाज पठाण,ग्यासुद्दिन खान , दिपक कांबळे,शिवा शिवचरण,शाहनवाज सय्यद,कविता खरे, गौरी येरूनकर,कमल चौधरी, धनवंती नागर,दमन सिंग, सोनी यादव,धर्मेंद्र चव्हाण, निवृत्ती मोरे,राहुल ओव्हाळ या शिबिराचे व्यवस्थापक भगवान पवार यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत आहे.
            रोजच्या झाडाखाली असणाऱ्या सदस्यता मोहीम व समस्या निवारण शिबिरामध्ये नागरिक आपल्या समस्या मांडत असतात, शहराप्रती मान्यवर या शिबिरात मार्गदर्शन देखील करतात, नागरिकांच्या नागरी समस्या सोडवणे यावर भर दिला जातो.यामुळे जनतेमध्ये एक विश्वास तयार होऊन नागरिक आपचे सदस्यत्व घेत आहे. शहरांमध्ये व तालुक्यामध्ये जनतेला हक्काचा व सहज उपलब्ध असणारा पक्ष म्हणून ओळख बनवण्यात अजून जोमाने काम करु असा आशावाद तसेच या शिबिरात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद मानून लवकरच नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन प्रभावी नियोजन करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन आपचे  रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन