खोपोली एक्झिट जवळ २० फूट ट्रक दरीत कोसळला ,क्लिनर जागीच ठार,चालक गंभीर

 खोपोली एक्झिट जवळ  २० फूट ट्रक दरीत  कोसळला ,क्लिनर जागीच ठार,चालक गंभीर 




पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ११ फेब्रुवारी,


                        मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट जवळ एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील कठड्याला धडक देऊन लोखंडी रेलिंग तोडून तो २० फूट दरीत कोसळला यात ट्रक मधील क्लिनर जागीच ठार झाला तर चालकाने ट्रक मधून उडी मारल्याने तोही जखमी झाला आहे, 
              कर्नाटक वरून ट्रक माल घेऊन अंबरनाथ कडे  मुबंई पुणे एक्सप्रेसने जात  असताना तो बोरघाटात खोपोली एक्झिट जवळ आला असता त्याचे ब्रेक निकामी झाल्याने त्याने खोपोली एक्झिट जवळील लोखंडी रेलिंगला जोरदार धडक देऊन ट्रक २० फूट दरीत कोसळला तर चालकाच्या तत्परतेने  त्याने  बाहेर उडी मारल्याने तो बचावला असून क्लिनरचा ट्रक मध्ये अडकून जागीच मृत्यू झाला आहे, तर चालकाच्या कंबरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे, 
                   या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्त सामाजिक संस्थेचे सदस्य, देवदूत यंत्रणा, आयआरबी यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रक मध्ये अडकलेल्या क्लिनरला बाहेर काढले परंतु त्याचा मृत्यू झाला होता. 



Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर