आम आदमी पार्टी पनवेल महानगरपालिका व रायगड जिल्हा यांच्या वतीने देण्यात आले निवेदन...

 राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली...गुंडगिरी रोखण्यात फडणवीस अपयशी,आप ने मागितला राजीनामा.


आम आदमी पार्टी पनवेल महानगरपालिका व रायगड जिल्हा यांच्या वतीने देण्यात आले निवेदन...


पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 

खालापूर : ३ फ्रेब्रूवारी,


            
             महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. पेपर फुटी प्रकरण असो की भ्रष्टाचार आणि गुंडागिरी थांबवण्यासाठी फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
             उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे दिसून येते. फडणवीसांच्या संरक्षणात भाजपचा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करू शकतो,तर राज्यातील सर्वसामान्य जनता सुरक्षित कशी राहणार? जनता या प्रकाराने भयभीत झाली आहे.
              महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांनी पोसलेल्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने पदावरून हटवावे. कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या गुंडगिरी करणार्या व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.भाजप नेते आणि आमदारांची गुंडगिरी थांबवण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी आम आदमी पार्टी पनवेल महानगर पालिका व रायगड जिल्ह्यातर्फे मागणी करण्यात आली आहे.






Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर