नंदू लवंगे यांच्या आमरण उपोषणाला समाज बांधवाची भेट

 धनगर आरक्षण अमलबजावणी साठी आमरण उपोषणाला अकोला जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा 

 नंदू लवंगे यांच्या आमरण उपोषणाला समाज बांधवाची भेट 


पाताळगंगा न्यूज :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर : १० फ्रेब्रुवारी,

                अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी साठी बुलढाणा जिल्ह्यातील एक धनगर समाज बांधव गेल्या १२  दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज एक प्रमुख मागणी घेऊन सरकार सोबत मागणी करीत आहे.ती म्हणजे भारतीय राज्यघटनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले असताना सरकार त्या गोष्टीकडे हेतू पूरस्पर दुर्लक्ष करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवल्या जात आहे .परंतु धनगर समाज आरक्षणाची मागणी करीत नसून जे घटनेने अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले आहे त्याची फक्त अंमलबजावणी करावी ही  मागणी धनगर समाजाची आहे.
              आमरण उपोषणाला बसलेल्या नंदू लवंगे यांना पाठिंबा देण्यासाठी बाळापूर तालुक्यातील व अकोला जिल्ह्यातील धनगर समाज यांनी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी आपला पाठिंबा दिला यावेळी शालिकराम साबे,कैलास घोंगे,राजेंद्र घोंगे,मनोज करणकार,संजय गव्हाळे,बाबाराव गव्हाळे ,शंकर खराटे,ज्ञानेश्वर कवळकार,ज्ञानेश्वर पाचपोहे,संतोष कात्रे,विशाल दिवनाले,दिलीप गव्हाळे,सतीश गव्हाळे,अरुण कात्रे,सौरभ पुंडे, मघाजी साबे, प्रा राजेश दिवनाले,राहुल वसतकार,राजकण्याताई कवरकार,अनुराधा डांगे,सुनीता गव्हाळे, अनिता घोंगे,सुनीता सुशिर,सुरेखा कलम,शारदा डांगे,अस्मिता कात्रे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन