मा. सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या प्रयत्नाने लवकरच सौर ऊर्जा पथदिवे रस्त्यावर झळकणार
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
माजगांव /आंबिवली : ९ फ्रेब्रुवारी,
ग्रुप ग्राम पंचायत माजगांव मा. सरपंच गोपीनाथ जाधव हे पदावर असतांना विविध विकास कामे करून गावामध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घडविण्यांचे काम त्यांनी केले, जल - जीवन मिशन योजना अंतर्गत त्यांनी पाण्यांचा प्रश्न मार्गी लावला,मात्र पद नसतांना सुद्धा विकास कामे करण्यांची आत्त्मियता सुटत नाही.माजगांव आंबिवली या दोन गावामध्ये ज्या ठिकाणी अंधार आहे..त्या ठिकाणी आमदार महेश बालदी यांच्या फंडातून सन २०२१-२२ मागणी करण्यात आली होती.आज दहा सौर ऊर्जा पथ दिवे रस्त्यावर झळकणार असल्याचे मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी पाताळगंगा न्यूज वेब पोर्टल शी बोलतांना सांगितले.
गावाचा विकास करण्यासाठी उत्तम मानसिकता असायला हवे, आपण पदावर असो किंवा नसो, मात्र चांगले काम करण्याची जिद्द असली की कामे होत असतात.या दोन गावामध्ये ज्या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी हे पथदिवे बसविले जाणार असल्यांचे सांगितले.विशेष म्हणजे हे विद्युत वाहिनी वर न चालता सूर्याच्या प्रखर उष्णता म्हणजे सौर उर्जेवर चालणार आहे.नागरिकांची समस्या विचारात घेत हा उपक्रम हाती घेण्यात आला.
गाव तिथे विकास होणे महत्वाचे महत्वाचे आहे.सायंकाळ झाली की काही ठिकाणी अंधार निर्माण होत असतो.अश्या वेळी सरपटणा-या सापांची भीती मोठ्या प्रमाणात असते.शिवाय आज वाढते गुन्हेगारी या अंधाराचा फायदा घेत असतात.मात्र या सर्व बाबींचा अभ्यास करून मा. सरपंच गोपीनाथ जाधव यांनी एक पाऊल पुढे टाकून हा उपक्रम हाती घेण्यात आले.मात्र या कामामध्ये राजकरण होत असल्याची खंत त्यानी व्यक्त केली.काम आपण करायचे मात्र श्रेय लाटण्यासाठी अनेकजण पुढे येत आहे.
0 Comments