राजिप शाळा वडगांव चे विद्यार्थी बनले व्यवसायीक
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : ९ फ्रेब्रूवारी ,
शिक्षणासमवेत व्यवहार ज्ञान असणे,अतिषय महत्वाचे आहे.हे उदिष्ठे डोळ्यांसमोर ठेवून राजिप शाळा वडगांव येथिल मुख्याध्यापक शुभाष राठोड यांच्या संकल्पनेतून आणी सरपंच गौरी गडगे यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना व्यवसायीक होण्यांचा उपक्रम हाती घेण्यात आला.शाळेत शिक्षण घेत असलेले बहुतेक विद्यार्थ्यांचे पालक वर्ग शेती करीत असून काही याला जोड धंदा म्हणून फळे -भाज्या लागवड करीत असतात.तसेच तयार झालेला माल आठवड्याच्या बाजारात किंवा बाजार पेठेत विक्री केला जात असतो.मात्र हेच ज्ञान उपजतच त्यांस असून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी या उद्दात विचारांतून हा उपक्रम हाती घेण्यात आला.
यावेळी भाजी,फळे,तसेच खाद्य पदार्थ यांचे दहा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते.तसेच यांचे दर विद्यार्थी यावेळी खरेदि साठी आलेल्या सर्व गि-हाईक ( ग्रामस्थ ) यांस समजून सांगत होते.विद्यार्थी सहज पणे अर्थिक व्यवहार करीत असल्यांचे पाहून जमलेले शिक्षक पालक वर्गांनी आपल्या मुलांचे कौतुक करीत असल्यांचे पहावयांस मिळाले,यावेळी सोबतच ऑनलाइन व UPI चा सुद्धा व्यवहारातून प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
यावेळी सरपंच गौरी महादेव गडगे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा करुणा रविंद्र ठोंबरे,उपाध्यक्षा राजश्री जांभूळकर , मुख्याध्यापक सुभाष राठोड सर्व शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
विद्यार्थ्यांना शालेय जीवणातूनच ,बचत,बँकिंग व्यवहार व डिजिटल पेमेंट UPI ची माहिती व्हावी व व्यावहारिक ज्ञान मिळावे हे ध्येय ठेऊन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.( राजिप शाळा वडगांव मुख्याध्यापक : शुभाष राठोड )
0 Comments