रा.जि.प.शाळा काढंरोळीचा वार्षिक स्नेहसमेलन संपन्न ,प्रमुख मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

 रा.जि.प.शाळा काढंरोळीचा वार्षिक स्नेहसमेलन संपन्न ,प्रमुख मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक  




पाताळगंगा न्यूज : नवज्योत पिंगळे 
खालापूर : १ मार्च,

           काढंरोळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या  वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे अनावरण खालापूर पंचायत समिती उप सभापती निवृत्ती पिंगळे,पोलीस पाटील वैशाली पिंगळे,यांच्या हस्ते झाले
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सुरवात गणेशाच्या नृत्याने झाली. इंग्रजी-मराठी एकांकिका, गीतगायन, पारंपारिक नृत्य, कोळीगीते, देशभक्तिपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केली.  तसेच, गुणवंत विद्यार्थ्यांसह  विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला.व शाळेतील दोन विध्यार्थी आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांचा व  त्यांच्या आई वडिलांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला 

                  ‘‘वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव शिक्षण संस्थेकडून केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो. नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही, तर व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांचा चांगला उपयोग होतो,’’ असे मत शाळेचे मुख्याध्यापक अडसूळे सर यांनी  सूत्रसंचालन केले  


           या वेळी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष अनील खडे, माझी उप सभापती निवृत्ती पिंगळे, पोलीस पाटील वैशाली पिंगळे, माजी सैनिक सुरेश पिंगळे, माजी  सैनिक हेमंत पिंगळे,ॲड. मनोज पाटील, पत्रकार नवज्योत पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते धनाजी फराड, देविदास पिंगळे, केशव पिंगळे, एकनाथ पिंगळे, जितेंद्र पालांडे, पांडुरंग भोसले, लंके सर,शेख सर शाळा व्यवस्थापण कमिटी आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण