प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने खालापुर शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वी रित्या साकारले प्रयोग पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा

 प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने खालापुर  शाळेमध्ये  विद्यार्थ्यांनी यशस्वी रित्या साकारले प्रयोग






पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर  : १ मार्च 

                 सी.व्ही.रमण यांच्या 'रामण एफेक्ट' या शोधाला १९३० मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला यांचा स्मरणार्थ संपूर्ण देशभरात विद्यार्थ्यां विज्ञान प्रदर्शन आयोजन प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चिलठण  ( प्रथम विद्यान केन्द्र ) यांच्या माध्यमातून  स्वामी विवेकानंद हायस्कूल खालापूर येथे करण्यात आले.यावेळी टाकावू तसेच रोजच्या दैनंदिन जिवनात वापरल्या जाणा-या वस्तू पासून ४५ प्रयोग साकारण्यात आले असून ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.४०० विद्यार्थ्यांनी हे प्रयोग समजून घेतले.तसेच यांस मार्गदर्शन करण्यासाठी १४ शिक्षक उपस्थित होते.     



 
            आजचे युग हे विज्ञान युग असल्यामुळे नविन - नविन प्रयोगातून आपल्याला खुप काही शिकण्यासारखे असून शिवाय आभ्यास क्रमात हे प्रयोग असून पुस्तकाच्या  चित्रामधून ते पहावयास मिळत असे,मात्र जेव्हा आपण स्वता हे प्रात्येकक्षिकरण करतो तेव्हा या विज्ञान विषयी आवड निर्माण होत असते.आजचे विद्यार्थी भविष्यात शास्त्रज्ञ व्हावे,त्यांनी आपल्या शाळेचे,गावाचे ,जिल्हाचे नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने हे प्रदर्शन राबविण्यात आले.                     


           प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चिलठण ( प्रथम विद्यान केन्द्र ) हे सातत्याने विविध शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कडून विविध प्रयोग करुन घेत आहेत.विषेश म्हणजे त्यांची माहिती त्यांस सांगत असल्यामुळे हे प्रयोग विद्यार्थी मनापासून करीत असतात.यासाठी येथिल शिक्षक रणजीत वाघमारे, गौरव बोहरा, अश्विनी भगत, विजय वानखडे, पूजा भोईर, प्रतिभा रास्कार तसेच मुख्याध्यापक,शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.



 



Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर