आ.महेंद्र थोरवेंच्या हस्ते चिंचवळी गोहे येथे विकासकामांचे भूमिपूजन
पाताळगंगा न्युज : दिनेश पाटील
साजगाव : १० मार्च,
खालापूर तालुक्यातिल चिंचवळी गोहे येथे कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या आणि साकवच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आ.महेंद्र थोरवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात पार पडले.
खालापूर तालुक्यातील होनाड ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवळी गोहे येथील मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा रस्ता हा कित्येक वर्षे नूतनीकरनाच्या प्रतीक्षेत होता. गावात मोठ्या प्रमाणात विकास होत असताना, मात्र या रस्त्याच्या कामाला निधी अभावी मुहूर्त लागत नव्हता. त्यामुळे चिंचवळी गोहे येथील शिंदेगटाचे युवानेतृत्व प्रवीण पाटील यांनी या रस्त्याच्या नूतनिकरणासाठी कर्जत खालापूरचे आ.महेंद्र थोरवे यांच्याकडे रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती.
त्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत आ.महेंद्र थोरवे यांनी रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तसेच गावातील जीर्ण झालेले साकव नव्याने बांधण्यासाठी अधिक निधी देत पाटील यांच्या मागणीची पूर्तता केली.याच रस्त्याच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा आ.थोरवे यांच्या हस्ते घेण्यात आला.यावेळी चिंचवळी गोहे येथील नाक्यावर श्रीफळ वाढवून ग्रामस्थ्यांच्या उपस्थितीत आ.थोरवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आपले विचार मांडत असताना, ग्रामीण भागातून जेव्हा मी फिरत असतो तेव्हा त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचतात का,त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकडे माझे बारकाईने लक्ष असते.चिंचवळी गोहे येथील हा रस्ता कित्येक वर्षे नूतनिकरणासाठी प्रतीक्षेत होता.या परिसरात काही दिवसांपूर्वी आलो असताना ही गोस्ट माझ्या लक्षात आली होती आणि त्याच वेळी गावातील युवानेतृत्व प्रवीण पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केल्याने मी त्वरित या रस्त्यासाठी निधी मंजूर केला तसेच गावातील साकवही जीर्ण अवस्थेत आहे असे सांगितल्याने त्यासाठी ही निधी दिला आहे.
भविष्यात आपल्या गावाच्या विकासासाठी अधिक निधी लागला तर ग्रामस्थानी हक्काने मागणी करावी कारण आपल्यामुळेच मी आज या पदावर पोहोचलो आहे आणि सामाजिक बंधिलकी जपण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहिन असे वक्तव्य कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आ.महेंद्र थोरवे यांनी केले तर प्रवीण पाटीलसह ग्रामस्थानी आ. थोरवे यांचे आभार मानले.
यावेळी युवासेना अधिकारी रोहित विचारे,जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील,तालुका प्रमुख संदेश पाटील,जनार्धन थोरवे,होणाडचे सपंच प्रकाश पाटील,उपसरपंच गणेश पाटील,सदस्य गणेश पाटील,रमेश पाटील,संदीप पाटील,श्रीराम पाटील,मारुती पाटील,रोहिदास पाटील,किरण पाटील,माधव ठोंबरे,सुनील पाटील यांसह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments