जागतिक महिला दिनांच्या निमित्ताने ताराराणी ब्रिगेड स्तुत्य उपक्रम,भाजी विक्रेत्या महिलांचा सन्मान
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ८ मार्च,
जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.महिला संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी स्विकारत असतांना व्यवसायात अग्रगण्य म्हणून मानल्या जात आहे.खोपोली या बाजार पेठेत अदिवासी महिला बाजार पेठ हातगाडी रस्त्यालगत भाजी,फळे,फुले विकण्यांचे काम करीत असतात.मात्र आज जागतिक महिला दिवस असल्यामुळे यांना गुलाब पुष्प, लाडू देऊन सन्मान करण्यात आला.
त्याच बरोबर उद्योजक, कांचन जाधव यांच्या मसाला दुकानात काम करणाऱ्या महिलांचाही गुलाब पुष्प,खावू देण्यात आले.यावेळी त्यांच्या चेह-यावर समाधानांचे हास्य पहावयांस मिळाले. खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. शितल राऊत तसेच पोलिस ठाण्यातील महिलांनाही गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा, वंदनाताई मोरे यांनी महिलांसाठी बहुमुल्य विचार व्यक्त केले.ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, कविता खोपकर, रायगड जिल्हा अध्यक्षा, वर्षा मोरे, खालापूर तालुका कार्याध्यक्षा, किशोरी चेऊलकर उपस्थित होत्या.आज या महिला दिनानिमित्त सर्व महिलांना ताराराणी ब्रिगेडच्या वतीने मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments