भारतातील सामाजिक समता या विषयावरील सहावी आंतरराष्ट्रीय परिषद लुंबिनी नेपाळ येथे संपन्न
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : १२ मार्च,
चलो बुद्ध की ओर मिशन अंतर्गत भारतातील सामाजिक समता सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन लुबिनी वर्ल्ड पीस हार्मोनि सेंटर येथे भारत सरकार मान्यता प्राप्त ग्लोबल ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन फोरम व भारतीय कर्मचारी मजदूर युनियन आणि इतर 16 संस्थाच्या वतीने दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी केले होते. सदर संस्थेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. गोरख साठे यांनी सदर ग्लोबल ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन फोरम चे उपाध्यक्ष मा. काशीराम जी. पैठणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरवात तथागतांच्या प्रतिमेचे पुष्प व डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशीलाने करण्यात आली.मंचवर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. काशीराम जी. पैठणे, जेष्ठ समाजसेवक मा. धीरजलाल टेलर, सुरजसिंग,प्रा. गोरख साठे,तसेच डॉ. खंडागळे उपस्थित होते. उदघाटन मा. धीरजलाल टेलर यांनी केले.
प्रस्ताविक भाषणात प्रा. साठे म्हणाले की चलो बुद्ध की ओर या मिशनचे सर्वेसर्वा आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते मा. पैठणे साहेब यांच्या मिशनचे लोंचिंग होत असल्याचे नमूद करून धम्म प्रचार करण्याचे आवाहन केले.
लुबिनी वर्ल्ड पीस हार्मोनि सेंटरच्या भव्य सभामंडपात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. काशीराम जी. पैठणे यांना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचा जाहीर सत्कार करून लॉर्ड गौतम बुद्ध अंतराष्ट्रीय जीवन साधना गौरव पुरस्कार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतराष्ट्रीय जीवन साधना गौरव पुरस्कार देश विदेशातील 50 संस्थाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
काशीराम जी. पैठणे यांनी संपूर्ण भारतात अन्याय अत्याचारा विरोधात लढा देऊन गरीब, वंचित, पिढीत, शोषित यांना न्याय मिळवून दिला. तसेच विद्यापीठ नामांतर लढ्यात मोठे योगदान व धम्मकार्याच्या अद्वितीय कार्याबद्दल त्यांना सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात आले असून सदर पुरस्कारमुळे बुलढाना जिल्ह्यातील धोत्रानंदाई गावाच्या वैभवात मनाचा तुरा रोवला गेला.
तसेच याच कार्यक्रमात खोपोली येथील जेष्ठ पत्रकार संतोष मोरे यांना पत्रकारितेतील अद्वितीय कार्याबद्दल बेस्ट संपादक तथा एडिटर जर्नालिस्ट नॅशनल अवार्ड देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे ग्लोबल ह्युमन राईट प्रोटेक्शन फोरम या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गोरख साठे सर यांनी बोलताना सांगितले.
मांचावरील पाहुण्यांनी सामाजिक समतेबद्दल मत व्यक्त केले. मा. काशीराम जी. पैठणे अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले की तथागत व डॉ. बाबासाहेबांचे समातेचे तत्व सर्व भारतीयांनी व जगातील लोकांनी पाळावे. मा. पैठणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय परिषदा संप्पन्न झाल्या आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्याकामी प्रा. गोरख साठे यांनी अत्यंत परिश्रम घेतले. भारत नेपाळ येथील सुमारे 47 आवर्डिज यांना मा. काशीराम जी. पैठणे यांच्या हस्ते पुरस्काराचे शानदार वितरण झाले. सर्वात शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
0 Comments