कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात विकास कामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका, किरण ठाकरे यांच्या नावाचा डंका...
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : १२ मार्च,
गेल्या अनेक दिवसापासून कर्जत खालापूर मतदार संघात विकास कामाचे भूमिपूजन सुरु असून यामध्ये कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांचा नावांचा डंका पहायला मिळत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ता अशी ओळख असल्याने यांच्या आशीर्वादाने व मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात भारतीय कर्जत विधानसभा अध्यक्ष किरणदादा ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून आज पर्यंत जवळपास एकशे चाळीस कोटी हुन अधिक निधी मंजूर करून आणली आहे ह्यामुळेच किरण ठाकरे यांच्या नावाचा डंका कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात होत आहे.खालापूर तालुक्यातील मौजे बीड खुर्द येथे सामाजिक सभागृह बांधणे व जय हनुमान मंदिर घोडीवली वाडी येथे सभामंडप याचे भूमिपूजन करण्यात आले.या वेळी बीड ग्रामस्थ, घोडीवली ग्रामस्थ व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.
भाजपा कर्जत विधानसभा अध्यक्ष किरणदादा ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून पाथरज गाव ते खोंडेवाडी रस्ता तयार करणे. ता.कर्जत या विकासकामांचा लोकार्पण सोहळा भाजपा कर्जत विधानसभा अध्यक्ष किरणदादा ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा सरकारी वकील राजेंद्र येरुणकर,जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सनी यादव, कर्जत खालापूर युवा मोर्चा संयोजक प्रसाद पाटील, संजय देशमुख भाजपा तालुका उपाध्यक्ष, माजी कर्जत तालुका सरचिटणीस संजयदादा कराळे,जगदीश आगीवले,लव्हेश कर्नूक ग्रामपंचायत सदस्य,नरेश शिंदे, शरद पिंगळे, नितीन कदम, नरेश यादव,रामदास घरत, रमेश आहीर, काशिनाथ रसाळ, रमेश रसाळ, राजेश ठानगे, भगवान डोंगरे,विशाळ कोकरे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments