रायगड किल्ला म्हणजे जणू स्वर्गच,किल्यांचा इतिहास ऐकताच तरुण वर्गांचे अंग शहारले

 रायगड किल्ला म्हणजे जणू स्वर्गच,किल्यांचा इतिहास ऐकताच तरुण वर्गांचे अंग शहारले 






पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
रायगड : १२ मार्च,

                     सह्याद्रिच्या कुशीत असलेला रायगड किल्ला जणू स्वर्ग म्हणून या किल्याकडे पाहिले जात आहे.सभोवोताली गर्द झाडी,खोल दरी अभेद असा हा किल्ला कसा असेल? यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांस पाहण्यासाठी खालापूर तालुक्यातील तरुण वर्गांनी रायगड किल्ला सर केला.विशेष म्हणजे रोप वे चे साधन असतांना सुद्धा त्यांचा उपभोग न घेता २०२३ पाय-या  चढत जावून हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस हे तरुण वर्ग नतमस्तक झाले.या वेळी जय भवानी,जय शिवराय ही ललकारी या ठिकाणी ऐकण्यांस मिळाली. 
               


       
हा किल्ला  महाराष्ट्र जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा मध्ये वसलेला असून समुद्र सपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे.मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख असून छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून ओळखून १६ व्या शतकात महाराजांनी आपली राजधानी बनविली.त्याच बरोबर शिवराज्याभिषेक,देहावत्सान याच ठिकाणी झाला होता.या किल्लांची माहिती घेण्यासाठी येथिल गाईड  बाळाराम ढेबे यांनी या किल्यांचा इतिहास सांगितला.




                 यावेळी ते म्हणाले की या ठिकाणी राज्याभिषेक ३२ मणांचे सिहासन अष्टप्रधान खोली,मेणा दरवाजा,राणीचा महाल,दासी वटा,धान्य साठविण्याची खोली,पालखी दरवाजा,स्वच्छता गृह,मनाची पालखी दरवाजा,टकमक टोक,राज्यां चा राहता राजवाडा,गंगासागर तळे,बाटप,टाकसाळ बँक ,तेहेली बुरुज,गुप्त चर्चा खोली,विजय स्तंभ,राजदरबार,कवी कळस निवास स्थान,नगारखाना,हिरकणी बुरुज,होळीचा माल,जगदीश्वराचे मंदिर,बाजार पेठ,हात्तीखाना असे विविध ठिकाण सांगत असतांना शरद देशमुख,अनिल भगत,योगेंद्र प्रसाद,चंद्रकांत कोंडिलकर,हरिचंद्र वाघे,संतोष वाघे,महादेव गडगे,काशिनाथ जाधव,सुरेश पाटील यांच्या अंगावर शहारे निर्माण झाले.आणी हा इतिहास ऐकताच मंत्र मुग्ध झाले.खरोखरच हा किल्ला अभेद्य असून पाहताच क्षणी मनामध्ये या किल्यांच्या बांधकाम विषयी मनामध्ये घर करून राहिले आहे.हिरोजी इंदोलकर यांनी बांधलेला किल्ला त्यांच्या कल्पना शक्तीचा प्रचिती या ठिकाणी अनुभवास मिळाली. 

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात