ढेकू येथील पायरोटास्क एनर्जी कंपनीत भीषण आग,सुदैवाने जीवितहानी टळली

 ढेकू येथील पायरोटास्क एनर्जी कंपनीत भीषण आग,सुदैवाने जीवितहानी टळली




पाताळगंगा न्युज : दिनेश पाटील                           साजगांव : १  एप्रिल 

            खालापूर तालुक्यातील ताकई-अडोशी रस्त्यावरील ढेकू गावाजवळ असलेल्या पायरोटास्क एनर्जी कपंणीत आग लागून कंपनीतील मशीनरी आणि कच्चा माल पूर्णतः जळून खाक झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.                                                                                      खालापूर तालुक्यातील ताकई-अडोशी रस्त्यावरील ढेकू गावाजवळ संध्याकाळी साडे पाचच्या दरम्यान पायरोटास्क एनर्जी कंपनीमध्ये शॉटसर्किटमुळे आग लागल्याचे समजते.या आगीने थोड्या वेळात रौद्ररूप धारण केले. मशीनवरील कारागीराला समजल्या नंतर त्याने सर्व कामगार आणि स्टाफला बाहेर काढले.त्यानंतर अग्निशमन दलास आणि खोपोली पोलीस ठाण्यात संपर्क करून घडलेला प्रकार सांगताच खोपोली अग्निशमन दल,टाटा स्टील अग्निशमन दल,आलाना अग्नी शमन दल,जे एस डब्लू पालिफाटा अग्निशमन दल तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहचून घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच अग्निशमन दलाच्या जवानांनी फोमचा वापर करीत आग विझविण्यास सुरुवात केली.                        दोन तासाच्या अथक प्रयत्नातून आग नियंत्रणात आणण्यात यश आले.या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाला नाही.मात्र या आगीत कंपनीचे लाखोचे नुकसान झाले हे मात्र खर आहे.यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी भरत सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली.


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर