मतदार जनजागृती साठी आयोजित सायकल रॅली साठी शेकडो तरूणांचा उत्फुर्त प्रतिसाद
पाताळगंगा न्युज : हनुमंत मोरे
लोकसभा निवडणूक कार्यक्रम १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज र्दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी सकाळी ७ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिळफाटा खोपोली ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कर्जत दरम्यान आयोजित केलेल्या सायकल रॅली साठी शेकडो तरूणांनी सहभाग दर्शवून निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या मतदार जागृती कार्यक्रमात सहभाग नोंदवून आम्ही निर्भयपणे मतदान करणार असल्याची ग्वाही दिली.
कर्जत १८९ विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी तथा स
हाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत निर्भयपणे तसेच शंभर टक्के मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत या प्रयत्नाला कर्जत १८९ विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.यानिमित्ताने आज सकाळी खालापूर ते कर्जत या १७ किमी अंतर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
हाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत निर्भयपणे तसेच शंभर टक्के मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत या प्रयत्नाला कर्जत १८९ विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.यानिमित्ताने आज सकाळी खालापूर ते कर्जत या १७ किमी अंतर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीला शेकडो तरूणांनी सहभाग दर्शवून निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.या रॅलीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांनी हिरवा झेंडा दाखवत सायकल रॅलीची सुरुवात केली .सदर कार्यक्रमास खालापूर पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी विक्रम कदम,खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ,नायब तहसीलदार सुधाकर राठोड,यांचेसह अपघात ग्रस्ताचे मदतीसाठी असलेले सदस्य, लायन्स क्लब खोपोली आदी सेवाभावी संस्था यांचे प्रतिनिधी, सर्वच प्रशासकीय विभाग यांसहस शेकडो नागरिकांनी सायकल रॅली मध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवला. सदर रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कर्जत व नवीन प्रशासकीय इमारत कर्जत येथे झाली.
___ कोट-
मतदारांनी आपले मतदान केले पाहिजे यासाठी निवडणूक आयोगाने सहकार्य करण्यासाठी अनेक पर्याय मतदारांच्या समोर ठेवले आहेत.अपंग व जेष्ठ नागरिकांसाठी घरातून मतदान करण्यासाठी नियम अमलात आणले आहेत तर जे मतदार मुद्दामहून मतदानासाठी मतदान केंद्रावर जात नाहीत त्यांनी स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी गेले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.आज सकाळी खोपोली ते कर्जत या १७ किमी अंतराचा सायकलच्या माध्यमातून प्रवास करून मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.या सायकल रॅलीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमाला तरूण मतदारांचा मिळालेला प्रतिसाद उर्जा वाढविणारा आहे.यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का नक्कीच वाढल्याचे पहायला मिळेल.
____ आयुब तांबोळी
तहसीलदार खालापूर
0 Comments