शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी स्वखर्चातून कर्जत व खालापूर तालुकाप्रमुखांना चारचाकी वाहनांची भेट

 शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी स्वखर्चातून कर्जत व खालापूर तालुकाप्रमुखांना चारचाकी वाहनांची भेट




पाताळगंगा न्युज :  समाधान दिसले
खालापूर : २ एप्रिल,

                   मुंबई आणि पुण्याचा अगदी मध्यवर्ती भाग म्हणून कर्जत, खालापूर या तालुक्यांची ओळख आहे. मात्र दोन्ही तालुक्यांची भौगोलिक परिस्थिती पाहता आदिवासी, डोंगराळ भागात वाड्यावस्त्या आहेत. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम पोहचविण्यासाठी तालुका प्रमुख काम करीत आहे, त्यांना निवडणूका आणि पक्षाच्या कामासाठी उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी स्वखर्चातून खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जतचे तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे यांनी बोलेरो वाहनांची भेट 1 एप्रिल रोजी दिली आहे. अष्टविनायक तीर्थक्षेत्र महड येथील श्री वरदविनायक मंदीर येथे दोन्ही वाहनांचे पूजन करण्यात आले आहे.
                शिवसेना पक्षात दोन गट पडल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या अमिषाला बली पडत शिंदे गटाला समर्थन दिले, परंतु काही निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव साहेब ठाकरे यांचे समर्थन करत त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केल्याचे पाहायला मिळाले, असाच निर्धार उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी करत कर्जत - खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष वाढीसाठी आपले सर्वस्व पणाला लावत या मतदारसंघात शिवसैनिकांना बळ देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
           उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कळंबे व खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनीही प्रामाणिकपणे शिवसेना पक्षाचे काम करत पडत्या काळात शिवसेनेला उभारी देण्याचे त्यांनी प्रामुख्याने कार्य केल्याने त्यांचेही निष्ठावंत शिवसैनिकांनी कौतुक केले.असता त्यांच्या याच निष्ठेची दखल घेत उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे व खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांना बोलेरो वाहनांची भेट देवून शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर