आडीवली व व्हराळे ग्रामपंचायतमधील असंख्य भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
पाताळगंगा न्युज : समाधान दिसले
खालापूर : २ एप्रिल,
शिरसे ग्रामपंचायत हद्दीतील आडीवली गावातील भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख केशव वांजळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तसेच व्हराळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच शेखर भोईर, सतीश भोईर, नारायण दरेकर, नीता वाघमारे, शकुन वाघमारे, निलेश पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये उत्तर रायगड उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून २ एप्रिल रोजी जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, ज्येष्ठ शिवसैनिक पंढरीनाथ राऊत, कर्जत शहरप्रमुख निलेश घरत, कर्जत शहर सहसंपर्कप्रमुख विनोद पांडे, उपशहरप्रमुख कृष्णा जाधव, युवासेना कर्जत सचिव संपत हाडप, बीड जिल्हा परिषद संघटक एकनाथ कोलंबे, सागर मोरे, युवासेना कॉलेज कक्ष कर्जत - खालापूर अधिकारी सुजल गायकवाड, कॉलेज कक्ष समन्वयक साहील मगर आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याने पुढील काळात पक्ष संघटना अधिक मजबूत होऊन कर्जत - खालापूर विधानसभा शिवसेनेतील गद्दारीनंतर बालेकिल्ला ठेवण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली दिवस रात्र मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
0 Comments