धाकटी पंढरी येथे नागरी सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन भक्तिमय वातावरणात संपन्न

 धाकटी पंढरी येथे नागरी सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन भक्तिमय  वातावरणात संपन्न




पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली  : २० एप्रिल ,

         सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्षा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेल्या नागरी सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 
         खालापूर तालुक्यातील श्री क्षेत्र धाकटी पंढरी येथे श्री विठ्ठल रखमाई मंदिरात नागरी सामाजिक विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ तसेच मंदिर प्रशासनासाठी आवश्यक असलेल्या साहित्य आणि वस्तूंचे लोकार्पण करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात समाजहित जोपासले जाईल अशा उपक्रमांचे आयोजन करावे असा आशावाद डॉ पंकज पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेस आगामी वाटचालीस शुभेच्छा देताना आपण देखील सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार आहोत असे आश्वासन खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी दिले.                             

    समाजकारणासोबत भारतीय लोकशाहीतले अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे नागरी कर्तव्य अर्थात मतदान करण्याचे आवाहन  खोपोली नगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी कुमारी जयश्री धायगुडे यांनी केले. धाकटी पंढरी देवस्थान समितीचे अध्यक्ष अनंता पाटील, उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी देखील संस्थेस शुभेच्छा दिल्या. यावेळी ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे,  उपाध्यक्षा कविता खोपकर, मेघा मोरे किशोरी चेऊलकर, रिद्धी केणी इत्यादी मान्यवरानी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. 
         रायगड जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील मान्यवर अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर