इंडिया बुल्स कंपनीतील थकीत वेतन, कामगारांना मिळाले ,सहा कामगारांना दिले,धनादेश,कामगार नेते भगवान ढेबे यांच्या प्रयत्नांना यश
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
पाताळगंगा : १८ एप्रिल,
खालापूर तालुक्यातील इंडिया बुल्स या कंपनीतील कोरोना काळातील थकीत वेतन अखेर कामगारांना मिळाले असून कामगार नेते रासप राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
खालापूर तालुक्यातील इंडिया बुल्स या कंपनीतील सहा कामगारांचे वेतन कोरोना काळात कंपनीने दिले नव्हते त्या कामगारांनी कामगार नेते भगवान ढेबे यांच्याशी संपर्क साधतं थकीत वेतन मिळवून देण्याची विनंती केली, याबाबत कामगार नेते ढेबे यांनी कंपनीची तक्रार कामगार आयुक्ताकडे करून कामगारांची बाजू मांडली.
कामगार आयुक्तानी याची दखल घेत अथक प्रयत्ना नंतर कामगारांना थकीत वेतन देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने व कॉन्ट्रॅक्टर मान्य केले,कंपनीनेही या कामगारांना थकित पगाराचे धनादेश दिल्याने कामगार नेते भगवान ढेबे यांचे कामगारांनी आभार मानले,तर या सहा कामगारांना वेतन मिळाल्याने कामगार त्यांच्या कुटूंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे,तर कामगारांना आज पगाराचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
0 Comments