माजगांव येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्सवांचे आयोजन

 माजगांव येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्सवांचे आयोजन 



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली २१ एप्रिल,
    
             दर वर्षी प्रमाणे माजगांव येथे विठ्ठल रखुमाई मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्सवांचे आयोजन तरुण वर्ग करीत असतात.हिंदु धर्मामध्ये येणारे विविध सण उत्सव साजरे करण्यांचे उपक्रम तरुण वर्गांनी हातात घेतला असल्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन योग्य विचारांतून करीत असल्यामुळे,त्यांच्या वर विविध स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.आज ची तरुण वर्ग सुद्धा विविध उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असल्यांचे पहाव्यांस मिळत आहे.
                दर वर्षी प्रमाणे येत असलेल्या हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते.यावेळी सकाळी ६ वा.काकड आरती,दुपारी ३ ते ४ वा,हळदी कुंकू,दुपारी ४ ते ५ वा, खेळ पैठणीचा,सायंकाळी ५ ते ६ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा,रात्री ८ नंतर महाप्रसाद रात्री ९ ते १२ वा.जागर भजन भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळ माजगांव यांच्या माध्यमातून करण्यांत येणार आहे.
           या कार्यक्रमाचे आयोजन जयेश पाटील, संदीप काठावले, सचिन काठावले ,किशोर काठावले, शरद काठावले, राजेश पाटील,हरेश पाटील,ऋषींकेश पाटील,  किरण पाटील, सतीश पाटील, मोतीराम काठावले,कैलास काठावले , गणेश काठावले,राम काठावले,रणधिर  पाटील,  दीपक काठावले,दिलीप काठावले ,अदिच्या मार्गदर्शनाखाली व सर्व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून  करण्यांत येत आहे.


                                                             
                 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर