थोर साहित्यिक रवा दिघे यांचे साहित्य नवदितांना प्रेरणा देणारे....... नमिता कीर

 थोर साहित्यिक रवा दिघे यांचे साहित्य नवदितांना प्रेरणा देणारे....... नमिता कीर                     



पाताळगंगा न्युज : जयवंत माडपे 
खोपोली : २३ एप्रिल,


                 थोर साहित्यिक रवा दिघे यांचे साहित्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे, त्यांच्या ग्रामीण साहित्याची जपणूक करणे काळाची गरज आहे, भावी पिढीला र वा दिघे समजले पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनासह तुमची व आमची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी खोपोली येथे केले. 
           कोमसाप खोपोली शाखेचा २९ वां वर्धापन दिन तसेच ज्येष्ठ साहित्यिक रवा दिघे यांच्या १२८  व्या जयंतीनिमित्त ब्राह्मण सभा खोपोली सभागृह आयोजित कार्यक्रमात नमिता कीर बोलत होत्या, याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष व साहित्यमित्र दत्ताजी मसूरकर, कोमसाप जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ, जनसंपर्क अधिकारी प्राध्यापक एल बी पाटील, प्रा. सादीका नवाब, जिल्हा कोषाध्यक्ष रेखा कोरे, कोमसाप खोपोली शाखेच्या अध्यक्ष व रवा दिघे यांच्या स्नुष उज्वला दिघे, अ वि जंगम व्यासपीठावर उपस्थित होते.  
             प्रारंभी इशस्तवन व स्वागत समारंभ झाल्यानंतर संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा अध्यक्ष उज्वला दिघे यांनी घेतला तर रवा यांच्या कादंबरी वरील कार्तिकी या चित्रपटातील अभंग जनार्धन सटाणे सर यांनी सादर केला.र वा दिघे परिवारातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे वितरण नमिता कीर यांच्या हस्ते झाले, यावर्षी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रा. सादीका नबाब तसेच साहित्य क्षेत्रात सातत्याने काम करणारे रवा दिघे यांचे सुपुत्र वामन दिघे यांनाही विशेष पुरस्कार देण्यात आला. 
        कै.स्वातंत्र्यसैनिक वसंतराव कुंटे शालेय पुरस्कार साक्षी घरत व उत्कर्षा भुजबळ यांनाही निर्मला कुंटे  हस्ते प्रदान करण्यात आला  जनसंपर्क अधिकारी प्रा. एल बी पाटील यांनी आपल्या भाषणात खोपोली शाखेचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. दत्ताजी मसुरकर यांनी कोमसाप  खोपोली शाखेला शुभेच्छा दिल्या, उत्कृष्ट सूत्रसंचालन नरेंद्र हर्डीकर यांनी केले. या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील तसेच शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक सरोदे सर यांच्या पसायदानाने या कार्यक्रमाची समाप्ती झाली. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर