रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव चे ध्वजारोहण नवागत विद्यार्थिनींच्या हस्ते
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
वडगांव : १ मे,
१ मे रोजी महाराष्ट्र दिन व इंग्रजी माध्यम या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी राजिप शाळा वडगांव येथे दाखल झाले,व शाळा व्यवस्थापक आणी मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या विचारांतून इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विभावरी,रिया व प्रिया या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यांत आल्यामुळे,त्यांच्या चेह-यावर समाधानांचे हास्य झळकत असल्यांचे पहावयांस मिळाले.
इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या पालकांनी मराठी शाळेत विद्यार्थ्यांच्या मध्ये होत असलेला सातत्याने बदल यामुळे मागील वर्षापासून पालकांनी या मराठी शाळेत पाठविण्यांचा निर्णय घेतला असल्यांचे पहावयांस मिळत आहे.त्याच बरोबर या शाळेमध्ये विविध उपक्रम साजरे करण्यांत येत असतात.त्याच बरोबर अनेक प्रोजेक्ट सुद्धा या विद्यार्थ्याकडून करुन घेतले जात असल्यांचे पहावयांस मिळत आहे.
शेताच्या बांधापासून ते पर्यावरणांतील असलेल्या वनस्पती ते व्यवसायिक कसे बनायचे यांचे मार्गदर्शन केले जात असल्यांमुळे हे विद्यार्थी आत्मामियता बनत आहे.या शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थी यांचा सन्मान जपला.जात असून यापूर्वीही राठोड सरांनी १५ ऑगस्ट रोजी मयुरी कातकरी या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण घेतला होता.या गावातील १०० टक्के पट संख्या भरण्यांचा विक्रम या शाळेनी केल्यामुळे या शाळेचे सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे.
0 Comments