महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचा संजोग वाघेरांना पाठिंबा

 महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचा संजोग वाघेरांना पाठिंबा 



पाताळगंगा न्युज :  समाधान दिसले
खालापुर : २६ एप्रिल,

         मावळ लोकसभेचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना सर्वसामान्यांकडून उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून त्यांना विविध संघटनांनी ही पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत असताना महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेने संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्या आशयाचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेच्या वतीने संजोग वाघेरे यांना शिलफाटा येथील बैठकीत देण्यात आले.
             यावेळी राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेलचे प्रवक्ते नसीम सिद्दिकी, ज्येष्ठ नेते सिराज मेहंदी, सुलतान मालदार, शिराज शेख, साजिद खान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष इस्माईल युनूस दिवाणी, उपाध्यक्ष शहाबाज लोगडे, कादिर उस्मान खेसे, महिला रायगड जिल्हा अध्यक्ष शबाना मुजम्मिल मुल्ला, ग्रामीण रायगड जिल्हा अध्यक्ष रिजाय नजीर काजले, तालुका कार्याध्यक्ष इम्तियाज चांद मुजावर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, खोपोली प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख, युवासेना अधिकारी पंकज रुपवते, प्रवक्ते विलास चालके, संघटक दिलीप पुरी आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होता.
              यावेळी संजोग वाघेरे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, आपण टाकलेल्या विश्वासाला कोणताही तडा न जाऊ देता पुढील काळात प्रामाणिकपणे तळागाळातील सर्वच समाजासाठी काम करेल तसेच आगामी काळात मुस्लिम समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम असे मत संजोग वाघेरे यांनी व्यक्त केले. 
           तर महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष इस्माईल युनूस दिवाणी यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की, इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले संजोग वाघेरे पाटील यांना आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत वाघेरे यांच्या निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व एक दिलाने काम करून संजोग वाघेरे यांच्या विजयात खारीचा वाटा उचलून असे दिवाणी म्हणाले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर