पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे आयोजन ,कल्याणकारी धनगर समाज संस्थेचे स्तुत्य उपक्रम
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २८ मे,
धनगर समाज कल्याणकारी संस्था रोहा तळा आयोजित धनगर समाजाचे आराध्य दैवत असेलेल्या राजामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले,असून ही जयंती शुक्रवार ३१ मे रोजी सायंकाळी ४ वाजता खंडोबा मंदिर रोहा येथे आयोजित करण्यात आली आहे.
धनगर समाज कल्याणकारी संस्था रोहा तळा मुरुड ही संस्था रायगड जिल्हातील धनगर समाजाच्या उन्नतीसाठी नेहमी अग्रेसर असून समाजाच्या अडीअडचणी सोडवून समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असते,तर अहिल्यादेवी होळकर जयंतीही मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते,
रोहा येथे या उत्सवाच्या निमित्ताने मारुती मंदिर चौक ते आडवी बाजारपेठ मार्गे खंडोबा मंदीर अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, तरी या जयंती उत्सावाला समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कल्याणकारी धनगर समाज संस्था रोहा तळा मुरुड संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग शिंगाडे, उपाध्यक्ष मनोहर वरक, सेक्रेटरी प्रकाश लांबोरे, सहसेक्रेटरी भालचंद्र कोकळे,खजिनदार बाळाराम होगाडे, कार्याध्यक्ष अनंता गोरे, सल्लागार धर्माजी हिरवे, आणि सर्व कमिटीच्या वतीने केले आहे.
0 Comments