खोपोली बाजारपेठ दुमदुमली जनसामान्यांच्या घोषणांनी
पाताळगंगा न्युज : दिनकर भुजबळ खोपोली : ५ मे,
खोपोली नगरपरिषद व नागरी सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोलीमध्ये घेतली गेली मतदार जनजागृती रॅली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार घालून या रॅलीची सुरुवात झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर परिवर्तन नाट्य कला संस्थेच्या कलाकारांनी मतदाराला जागृत करण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने पथनाट्य सादर केले. याप्रसंगी खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी , नायब तहसीलदार सुधाकर राठोड , खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील खोपोली , नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी मा.गौतम भगळे , आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती जयश्री धायगुडे तसेच मुख्य लिपिक निशिकांत सुर्वे , केंद्र समन्वयक लियाकत पठाण , मुख्य वैद्यकीय अधिकारी संगीता वानखेडे , मुजफ्फर मांडलेकर, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ , अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोलीचे कार्याध्यक्ष महेंद्र ओव्हाळ, सुनील जगताप, केटीएसपी मंडळाचे राजेश अभाणी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
पायी रॅली ही खोपोली अग्निशामन दलापासून चालू झाली या रॅलीमध्ये खोपोलीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली , या रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्या ही महिलांची दिसून आली तसेच यामध्ये खोपोली मधील अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग दर्शविला . यामध्ये बुज हास्य चे बाबुभाई ओसवाल, खिदमते खलक चे आयुब खान , आपतग्रस्तचे गुरुनाथ साठिलकर तसेच खोपोलीतील शिक्षक वर्ग आणि अनेक स्तरावरील मान्यवर उत्साहाने सहभागी झालेले दिसून आले.
या रॅलीचे आयोजन नागरी सामाजिक विकास संस्थेने केले होते , त्याला नगर परिषदेने देखील तितकाच हातभार लावून ही रॅली अतिशय सुंदर पद्धतीने पार पडली. खोपोलीमध्ये प्रथमच जनजागृतीसाठी अशी रॅली झाली असून खोपोली बाजारपेठ जनसमुदायाच्या घोषणांनी दुमदुमली या रॅलीचे आयोजन करण्यामागचा एकच उद्देश होता.मतदान हा आपला हक्क आहे आणि कर्तव्य देखील, याचा विसर न पडू देता आपण आपले कर्तव्य बजाऊया तरच आपली लोकशाही बलशाही बनेल , आणि हेच पटवून देण्यासाठी पथनाट्याचे अतिशय सुंदर आणि सादरीकरण झाले त्याचे देखील तहसीलदारांनी विशेष कौतुक केले. परिवर्तन नाट्य संस्थेच्या कलाकारांचे पथनाट्यासाठी सर्वांनीच विशेष कौतुक केले , तसेच नागरी सामाजिक संस्थेचे देखील सर्वांनी या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले.
खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी याप्रसंगी बोलताना सर्वच खोपोलीकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. आणि मतदानासाठी शुभेच्छा देखील दिल्या त्याच प्रसंगी खोपोलीच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री धायगुडे यांनी अतिशय सुंदर गीत गाऊन जनसामान्यांना मतदानासाठी आवाहन केले . याप्रसंगी नागरी सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ वर्षा राजेश मोरे यांनी देखील खोपोलीमध्ये शंभर टक्के मतदान व्हावे अशी अशा व्यक्त केली . अशा प्रकारे खोपोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासन आणि सामाजिक संस्थेने मिळून जनजागृती यशस्वीरित्या पार पाडली. याप्रसंगी अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले. यामध्ये एनसीसीच्या पथकाने ही सहभाग घेतला.
0 Comments