संजोग वाघेरे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीची बैठक - घरोघरी जावून करणार प्रचार
निवडणूक प्रचार प्रमुखपदी कैलास गायकवाड यांची निवड
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ६ मे,
मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी खोपोलीत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. मतदान १३ मे रोजी असल्याने राहिलेल्या सहा दिवसात प्रचाराची रणनिती ठरविण्यासाठी रविवार ५ मे रोजी लोहाना समाज सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून शेकापक्षाचे नेते कैलास गायकवाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी इंडिया आघाडीचे निवडणूक प्रमुख कैलास गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख, शेकापक्षाची चिटणीस किशोर पाटील, खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे, शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, आपचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अतुल पाटील, रविंद्र रोकडे, सागर जाधव, विलास चाळके, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष सुवर्णा मोरे, शिवसेना उपजिल्हा संघटिका अनिता पाटील, खोपोली शहर शिवसेनेच्या सुखदा बने, काँग्रेसच्या शहराध्यक्ष रेखा जाधव, शेकाप शहर प्रभारी महिला चिटणीस ज्योसना रोकडे यांच्यासह प्रमुखांसह मोठ्या संख्येने इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रत्येक प्रभागात घरोघरी जावून प्रचार केला जाणार असल्याचे खोपोली शहर काँग्रेस अध्यक्ष रिचर्ड जाँन यांनी सांगितले. महिलांनी स्वयपाकघरात जावून इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना का मतदान करायला हवं यासंबंधीची माहिती पटवून द्या असे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी सांगितले. आपले उमेदवार हे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आहेत. त्यांच्या पत्नी गेल्या २५ वर्षापासून नगरसेविका आहेत. त्यामुळे वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड शहरात केलेला विकास आपल्या लोकांपर्यंत पोहचवून आपल्या शहराचा विकास करण्यासाठी वाघेरे यांना निवडून देण्याचे अवाहन करा असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अतुल पाटील यांनी व्यक्त केले.
तर महाविकास आघाडीचे पदाधिकारी अनेक दिवसांपासून एकदिलाने काम करीत असल्याने निश्चित आपला विजय आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत एकजूट ठेवू काम करण्याचे अवाहन शेकापक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी व्यक्त केले आहे.
हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत आहे. परंतु भाजप आपाआपसांत भांडण लावत असल्याने आपण सावध व्हायला हवं, संविधान बदल्याचा डाव आहे असे सांगत श्याम कांबळे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
चाळीस चोरांना चोरून भाजपने सत्ता स्थापन केली आहे.या गद्दारांना धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचे अवाहन निवडणूक प्रचार प्रमुख कैलास गायकवाड यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी सुचना मांडून प्रचाराचे नियोजन करण्यात आले. भव्य बाईक रँलीचे आयोजन करण्यात येणार असून यासंबंधीचे माहिती आपचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे यांनी दिली. तर बैठकीचे सुत्रसंचालन सागर जाधव, रविंद्र रोकडे यांनी केले.
0 Comments