माथेरान मध्ये राजामाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

 माथेरान मध्ये राजामाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

      


पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २ जुन ,

             राजामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज माथेरान मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
            धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या राजामाता पुणश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९  वी जयंती आज मोठ्या उत्साहात   इंदिरा गांधी   नगर  येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिरात साजरी करण्यात आली. 
              यावेळी सकाळी समाज बांधवाच्या  वतीने  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.यावेळी माथेरान पतसंस्था संचालक रामचंद्र राजाराम ढेबे, भटक्या विमुक्त आघाडी रायगड जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम आखाडे, सामाजिक कार्यकर्ते बाबू धोंडू ढेबे, जगन्नाथ धोंडू ढेबे, माथेरान माजी धनगर समाज अध्यक्ष अतिश जगन्नाथ ढेबे,सामाजिक कार्यकर्ते सुरेश ढेबे आदिसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर