राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खोपोलीच्या वतीने विश्व पर्यावरण दिवस उत्साहात साजरा

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खोपोलीच्या वतीने विश्व पर्यावरण दिवस उत्साहात साजरा



पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ७ जून,

           ५ जून हा दिवस सर्वत्र विश्व पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो.त्या दिवसाचे औचित्य साधून सर्व विधायक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामाजिक बांधिलकीचा वसा जपत आज वृक्षारोपण केले 
           खोपोली जवळील धामणी गावात हे वृक्षारोपण करण्यात आले संघाचे स्वयंसेवक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी उत्स्फूर्तपणे या वृक्षारोपण मोहिमेत भाग घेतला 
काजू आवळा चिंच पेरू रिठा बांबू अशा ५० वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.सर्व सेवकांनी पर्यावरण पूरक गीत गायन करून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले.भारत मातेचा जयघोष करत  कार्यक्रमाची सांगता झाली.....

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर