धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी दिली मा. सरपंच संजय कोकरे यांच्या घरी सदिच्छा भेट...

 धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी दिली मा. सरपंच संजय कोकरे यांच्या घरी सदिच्छा भेट...





पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २३ जुलै,


           महाराष्ट्र राज्य धनगर समाजाचे  नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भावी आमदार उत्तरराव जानकर यांनी मा. सरपंच संजय कोकरे यांच्या लोणावळ्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.  
               धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी माळशीरज तालुक्याचे भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे ऊत्तमरावजी जानकर यांनी आज मावळ तालूका धनगर समाजाचे नेते, मा.सरपंच संजय कोकरे  यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.  
              मावळ तालूका धनगर समाजाचे संजय कोकरे हे तरुण युवा नेतृत्व असून त्यांनी मोरवे कोळे चाफेसर ग्रामपंचायतचे अनेक वर्ष सरपंच पद भूषविले आहे, तर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी मावळ तालूका  सचिव पद, व्हाईस चेअरमन  विविध कार्यकारी सोसायटी आपटी  यांचे पदही त्यांच्याकडे असून राजकारण व समाजकारणात संजय कोकरे  हे अग्रेसर आहेत मा. सरपंच संजय कोकरे आणि ऊत्तमराव जानकर यांचे जवळचे संबंध असून  संजय कोकरे हे जानकर यांचे निकटवर्तीय मानले जातात, 
         त्यामुळे ऊत्तमराव जानकर यांनी  संजय कोकरे यांच्या लोणावळ्यातील घरी सदिच्छा भेट दिली, त्यांचे माजी सरपंच मीनाक्षी कोकरे यांनी औक्षण करून पुष्पगुच्छ  देऊन त्यांचे  यथोचित स्वागत यावेळी   माजी सदस्य महागाव गणेश  गोरे,माजी उपसरपंच अरुण मरगळे,  युवा नेते प्रकाश मरगळे, रामदास आखाडे आदीसह अनेक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर