माजी विद्यार्थ्यी निकिता अनंता जाधव हिचा वाढदिवस शाळेत साजरा, वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

 माजी विद्यार्थ्यी निकिता अनंता जाधव हिचा वाढदिवस शाळेत साजरा, वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप



    
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
वडगांव : २२ जुलै,

        
            रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव येथील निकिता अनंत जाधव हिच्या वाढदिवस ह्या शाळेत साजरा करण्यांत आला.विषेश म्हणजे ही मुलगी या शाळेची माजी विद्यार्थींनी असल्यामुळे माझा हा दिवस कोठेही साजरा न करता ज्या शाळेमध्ये मी श्री गणेशा चा प्रारंभ केला. त्याच शाळेत साजरा करण्यांचा मानस व्यक्त केला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांस वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी तीचे वडील शिक्षक आणी या परिसरातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
             अनंता जाधव हे या मुलीचे वडील असून ते या शाळेचे माजी शाळा व्यवस्थापन समिती,अध्यक्ष होते.आज ही समाज्यामध्ये असे काही व्यक्ती आहेत. की ते आपला वाढदिवस सर्वसामन्य नागरिक अथवा शाळेय विद्यार्थी यांच्या समवेत साजरा करीत असतात.यामुळे मनाला समाधान मिळत असते.शिवाय तो आनंद वेगळाच असतो. वर्षातून एकदाच येणारा हा दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप अनंदाचा असल्यामुळे शाळेतच साजरा करण्यांत आला.

               यावेळी मुख्याध्यापक सुभाष राठोड, ग्रुप ग्रामपंचायत वडगाव, मा.सरपंच महादेव गडगे,सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर म्हात्रे,धीरज गडगे,वसंत ठोंबरे, शिक्षक -  वौजिनाथ जाधव,स्वयं सेविका निकिता गडगे,साक्षी जांभुळकर, श्रुतिका जांभुळकर, भाग्यश्री तांबोळी,आकांक्षा जाधव,वेदीका गडगे,मानसी गडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी आभार प्रदर्शन कृतिका  गडगे व यश पाटील यांनी मानले. 


चौकट 
   या शाळेत मी शिकले माझे वडील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते,राठोड सर मला शिकवायला होते,माझा वाढदिवस आणि गुरुपौर्णिमा याचा योग साधून एक शाळेच्या ऋणाप्रती उतराई होण्याचा प्रयत्न मी केला.
निकिता अनंता जाधव,माजी विद्यार्थिनी.

चौकट 

माजी विद्यार्थी व येथील सामाजिक कार्यकर्ते नेहमीच शाळेला मदतीचा हात देत असतात.यातून शाळेचा शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा प्रवास सुखमय होत आहे,अनेक मुलांना शैक्षणीक साहित्यामुळे सहाय्य होत आहे. 
मुख्याध्यापक राजिप शाळा वडगाव : सुभाष राठोड 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर